प्रथमेश वाडेकरचे सीए परीक्षेत यश

⚡वेंगुर्ला ता.०१-: वेंगुर्ला-भटवाडी येथील रहिवासी प्रथमेश राजेंद्र वाडेकर याने अंतिम सीए परीक्षेत यश संपादन केले आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण वेंगुर्ला नं.४, ५वी ते १०वी पर्यंतचे शिक्षण वेंगुर्ला हायस्कूलमध्ये तर पुढील बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण त्याने पुणे येथे पूर्ण केले.

  सीए परीक्षेसाठी बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक त्याचे वडील राजेंद्र वाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

फोटो – प्रथमेश वाडेकर

You cannot copy content of this page