विविध उपक्रमांनी निवासी शिबिर संपन्न

⚡वेंगुर्ला ता.०१-: जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा आडेली नं.१च्या भगतसिग स्काऊट पथकाच्यावतीने आडेली गावठाणवाडीच्या शेतात निसर्गरम्य वातावरणात दोन दिवसीय निवासी शिबिर घेण्यात आले.

   या शिबिराकरीता स्काऊट मास्तर सीताराम लांबर व कब मास्तर बापू धुरी यांच्यासह ४२ स्काऊटर्सनी सहभाग घेतला. यामध्ये स्वच्छता, तंबू उभारणे, स्वतःचे साहित्य व्यवस्थित मांडणे, स्वतःची काम स्वतः करणे, टापटीपपणा, विविध प्रकारच्या गाठी व त्यांचा वापर करुन गॅझेट बनविणे, विविध साहसी खेळ खेळणे, शेकोटी कार्यक्रम या विविध उपक्रमांचा अंतर्भाव या शिबिरामध्ये करण्यात आला होता. शिबिर यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव परब, शिक्षणप्रेमी राजू सामंत, विनायक धर्णे, लक्ष्मण परब यांच्यासह अन्य समितीच्या संघाचे सहकार्य लाभले. या शिबिरास आडेली नं.१चे मुख्याध्यापक भिवा सावंत, केंद्रप्रमुख महादेव आव्हाड, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, शिक्षण विस्तार अधिकारी सुनिता भाकरे, जिल्हा स्काऊट गाईड आयुक्त महेश धोत्रे, उपशिक्षणाधिकारी शोभराज शेर्लेकर यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत हितगुज केले.
You cannot copy content of this page