⚡बांदा ता.०१-: रेडी येथील मातोश्री पार्वती राऊत विद्यालय इंग्लिश माध्यम प्रशालेने इंटरमिजीएट व एलिमेंटरी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. एलिमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी प्रशालेचे ६१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ३ विद्यार्थी अ श्रेणीत, १६ विद्यार्थी ब श्रेणीत तर ३७ विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण झाले.
इंटरमिजीएट ग्रेड परीक्षेसाठी प्रशालेतून २४ विद्यार्थी बसले होते. पैकी एक विद्यार्थी अ श्रेणीत, ८ विद्यार्थी ब श्रेणीत तर १२ विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे कला शिक्षक दिनेश परब यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प. म. राऊत, चिटणीस डॉ. विनय राऊत, सल्लागार एम. पी. मेस्त्री, श्री. पडवळ, प्रशालेच्या मुख्याध्यापिका गीता विल्सन, प्रशालेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
चित्रकला ग्रेड परीक्षेत मातोश्री पार्वती राऊत विद्यालयाचे यश
