महिलांसाठी गारमेंट उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणार-:सरपंच डॉ अर्चना सावंत

⚡सावंतवाडी ता.०१-: महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी माजगावात गारमेंट उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दिल्ली येथील सेवाभावी संस्थेचे प्रियंका यांनी यांनी आज येथे सांगितल. यावेळी त्यांनी शिवणकामाची माहिती जाणून घेत महिलांना मार्गदर्शन केले. हे शिबिर माजगाव ग्रामपंचायत येथे सरपंच सौ अर्चना सावंत यांच्या उपस्थितीत पार पडले.

यावेळी उपसरपंच वेजरे, सदस्य संजय कानसे, अशोक धुरी, प्रज्ञा भोगण, विशाखा जाधव, ग्राम विकास अधिकारी गोसावी ,श्रद्धा सावंत गावातील महिला उपस्थित होत्या.

यावेळी ग्रा.प.सदस्या सौ. गिता कासार, यांनी प्रास्ताविक केले तर सौ मधु कुंभार यांनी आभार मांडले.

You cannot copy content of this page