⚡सावंतवाडी ता.३१-: शहरात शिरोडा नाका येथे नव्याने सुरु केलेल्या श्री.सऊद मुजावर कुंटूबियाकच्या “फ्रेश बेक्स बेकर्स” या बेकरीचे आज दिमाखात उद्घाटन झाले. श्री मुजावर यांनी आपली पत्नी फिरदोस मुजावर याच्या हस्ते या बेकरीचे उद्घाटन केले. यावेळी मुजावर कुंटूबिय,नातेवाईक आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेली ६० वर्ष बेकरी व्यवसायात असलेल्या मुजावर कुटुंबियांनी सावंतवाडीत आपली नविन शाखा सुरु केली आहे. यातुन सावंतवाडी बरोबर सिंधुदुर्गात दर्जेदार स्वादिष्ट बेकरी पदार्थ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. येथील शिरोडा नाका येथे ही सेवा उपलब्ध होणार आहे. आज झालेल्या उद्घाटन सोहळ्याला अनेकांनी उपस्थिती दर्शवून श्री मुजावर यांना शुभेच्छा दिल्या.

