Headlines

मडुरा-भुताचे टेंब परिसरातील वायंगणी भातशेती गव्यांकडून फस्त

⚡बांदा ता.०५-: मडुरा – परबवाडी येथील भुताचे टेंब परिसरातील वायंगणी भातशेतीसह रब्बी पिकांचे गव्यांच्या कळपाने अतोनात नुकसान केले आहे. शेतकरी बाबली चिंतू परब व ज्ञानेश पांडुरंग परब यांच्या सुमारे एकरभर क्षेत्रातील वायंगणी शेती गव्यांनी फस्त केली. तसेच बाबली परब यांच्या मिरची रोपांचीही नासधूस केली. वनविभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा. नुकसानीचे पंचनामे करुन संबंधित शेतकर्‍यांना भरपाई देण्याची…

Read More

सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव :विजय गांवकर

⚡कणकवली ता.०५-: जिल्ह्यातील, तालुक्यातील मुल शिकावीत, मोठी व्हावी आणि ती आपल्या ध्येय धोरणांपर्यंत पोहोचावी. यासाठी नेहमी धडाडीचे प्रयत्न करत असलेले जि. प. माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत व त्यांच्या पत्नी जि.प.सिंधुदुर्गच्या माजी अध्यक्ष संजना सावंत तसेच सावंत कुटूंबीय हे नेहमीच राजकारणापलीकडे समाजाला, शाळकरी मुलांना तसेच इतर गरजुना काहीतरी देण्याचे प्रयत्न करत असतात. २०१८ पासून…

Read More

मनोज मोंडकर, पुनम चव्हाण यांनी भाविकांसाठी केली वाहनाची सोय

प्रभाग ९ मधील नागरिकांना आंगणेवाडीला जाण्या येण्यास झाले सुलभ मालवण ता.०५-: आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीच्या यात्रेस जाणाऱ्या मालवण शहरातील प्रभाग ९ मधील भाविकांना वाहणाची अडचण भासू नये यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मनोज मोंडकर आणि सौ. पूनम चव्हाण यांच्या संकल्पनेतून खास यात्रा स्पेशल गाड्यांची सोय करण्यात आली होती. आंगणेवाडी यात्रेस जाणाऱ्या भाविकांना यात्रेस…

Read More

कोल्हापूर विभागातील शिक्षकांच्या समस्या मांडल्या उपसंचालक चोथे यांच्या दरबारी

कास्त्राईब शिक्षक संघटनेने घेतली भेट;आ आजगावकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी होते उपस्थित कणकवली 5 फेब्रुवारी (प्रतिनिधी)-कास्ट्राईब शिक्षक संघटनेची बैठक कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांच्यासोबत कोल्हापूर कार्यालयात विविध विषयावर पार पडली असून याप्रसंगी आमदार जयंत आजगावकर,राज्य सरचिटणीस आकाश तांबे, महासचिव नामदेवराव कांबळे, विभागीय अध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत , कोल्हापूर , सांगली ,सातारा, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आदींनी उपस्थित…

Read More

कलमठ शिवतेजा मित्रमंडळ अध्यक्षपदी सचिन कुवळेकर

⚡कणकवली ता.०५-: कलमठ बाजारपेठ येथील शिवतेजा मित्रमंडळाच्या अध्यक्षपदी सचिन कुवळेकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे. शिवतेजा मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर झाली असून ती पुढीलप्रमाणे आहे.सचिवपदी शशिकांत कांबळी, कार्याध्यक्षपदी परेश कांबळी, उपाध्यक्षपदी सुप्रिया साळगावकर, सुयोग कांबळी, सहसचिवपदी तुषार हजारे, खजिनदारपदी मंथन हजारे, सदस्यपदी संदीप कांबळी, अनिकेत कांबळी, द्विजेश लोकरे, निखिल हजारे, निश्चय हुन्नरे, नील लोकरे तर…

Read More

ह्युमन राईट प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी मंदार काणे

जिल्हा उपाध्यक्ष किशोर राणे तर जिल्हा सचिवपदी अर्जून परब ⚡कणकवली ता.०५-: ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या नवनियुक्त सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी मंदार काणे यांची तर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून किशोर राणे आणि जिल्हा सचिवपदी – अर्जून परब यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष खंडूदेव कटारे व राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद केसरकर तसेच महाराष्ट्र राज्य सचिव राकेश शिंदे व…

Read More

नांदगाव ग्रामपंचायतचे लिपिक
लक्ष्मीकांत मोरजकर यांचे निधन

⚡कणकवली ता.०५-: नांदगाव मोरयेवाडी येथील श्री. लक्ष्मीकांत उर्फ नूतन सुधाकर मोरजकर ( वय ३८) याचे आकस्मिक निधन झाले.लक्ष्मीकांत मोरजकरहे नांदगाव ग्रामपंचायत कार्यालयात गेली 15 वर्षे लिपिक या पदावर काम करत असल्याने त्याचा चांगला जनसंपर्क होता. मनमिळाऊ व हसतमुख स्वभावाचे लक्ष्मीकांत नूतन या टोपण नावाने नांदगाव परिसरात परिचित होते. त्याच्या पश्चात वडील, आई, भाऊ, बहीण, काका,काकी,भावजय,…

Read More

बांदा येथे केंद्रस्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन

⚡बांदा ता.०५-: महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ पुणे यांच्या वतीने १२फेब्रवारी रोजी होणाऱ्या परीक्षेची तयारी व्हावी यासाठी बांदा केंद्रात शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले. बांदा केंद्र प्रमुख संदीप गवस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या परीक्षेचे उद्घाटन बांदा ग्रामपंचायत सदस्या रुपाली शिरसाट यांच्या हस्ते झाले. यावेळी अंतिम परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी बांदा केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या सराव…

Read More

संत रोहिदास यांचे कायम स्मरण राहण्यासाठी पतसंस्थेची स्थापना

संत रोहिदास पतसंस्था अध्यक्ष तानाजी वाडकर यांचे प्रतिपादन ⚡सावंतवाडी ता.०५-: राष्ट्रीय संत रोहिदास मोगलांच्या काळात हिंदू धर्म वाचवण्याचे काम दलित समाजाला उभारी देण्याचे काम केले. उत्तर प्रदेश पंजाब भागात संत रोहिदास यांची देवालये आहेत किमान आपल्या संताचे साहित्य नव्या पिढीला समजावे समाजाच्या संताचे साहित्य हे मराठीतून उपलब्ध व्हावे संत. रोहिदास यांचे कायमस्मरण व्हावे यासाठी पतसंस्था…

Read More

विद्यार्थ्यांनी समरसतेने क्षेत्र निवडल्यास करिअर साधणे सोपे

माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप ⚡वेंगुर्ले ता.०५-: स्नेहसंमेलनातून विद्यार्थी घडत असतात आपल्यातील कलागुण ओळखून विद्यार्थ्यांनी समरसतेने जर क्षेत्र निवडले तर त्यांना पुढील कालावधीमध्ये करीअर निवडणे सोपे जाते असे प्रतिपादन वेंगुर्ले माजी नगराध्यक्ष मा. दिलीप गिरप यांनी केले.

Read More
You cannot copy content of this page