कलमठ शिवतेजा मित्रमंडळ अध्यक्षपदी सचिन कुवळेकर

⚡कणकवली ता.०५-: कलमठ बाजारपेठ येथील शिवतेजा मित्रमंडळाच्या अध्यक्षपदी सचिन कुवळेकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे.

शिवतेजा मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर झाली असून ती पुढीलप्रमाणे आहे.सचिवपदी शशिकांत कांबळी, कार्याध्यक्षपदी परेश कांबळी, उपाध्यक्षपदी सुप्रिया साळगावकर, सुयोग कांबळी, सहसचिवपदी तुषार हजारे, खजिनदारपदी मंथन हजारे, सदस्यपदी संदीप कांबळी, अनिकेत कांबळी, द्विजेश लोकरे, निखिल हजारे, निश्चय हुन्नरे, नील लोकरे तर सल्लागारपदी किरण हुन्नरे, प्रसाद कांबळी, जीवन हजारे, सूर्यकांत हुजरे, समीर कांबळी, प्रशांत कांबळी यांची निवड करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page