ह्युमन राईट प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी मंदार काणे

जिल्हा उपाध्यक्ष किशोर राणे तर जिल्हा सचिवपदी अर्जून परब

⚡कणकवली ता.०५-: ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या नवनियुक्त सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी मंदार काणे यांची तर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून किशोर राणे आणि जिल्हा सचिवपदी – अर्जून परब यांची निवड करण्यात आली आहे.

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी नव्याने निवड करण्यात आलेल्या मंदार काणे यांनी यापूर्वी संघटनेमध्ये जिल्हा संघटक म्हणून केलेली सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेऊन त्यांच्यावरती यावेळी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.तसेच संघटनेच्या कार्यात सक्रिय राहून संघटनेसाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या क्रियाशील पदाधिकारी व सदस्यांना नवीन जबाबदारी देऊन संधी दिली आहे.जेणे करुन संघटना वाढीसाठी योगदान देणाऱ्याचा खरा कस लागणार आहे.त्याचबरोबर संघटनेच्या माध्यमातून केलेले कार्य प्रत्येकापर्यंत सोईस्करित्या पोहचविण्यास मदत होईल.तसेच संघटना वाढीसाठी नवनवीन संकल्पना व उपक्रम हाती घेणे आवश्यक  असून त्यामुळे संघटनेची व्याप्ती वाढवण्यासाठी मदत होईल.

राष्ट्रीय अध्यक्ष खंडूदेव कटारे व राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद केसरकर तसेच महाराष्ट्र राज्य सचिव राकेश शिंदे व राज्य निरीक्षक घन:श्याम सांडीम यांच्या मार्गदर्शना नुसार कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी जाहीर केली आहे.

संघटनेची नवीन जिल्हा कार्यकारिणी पुढील प्रमाणे:-
जिल्हाध्यक्ष मंदार काणे- (पडेल, तालुका देवगड)
जिल्हा उपाध्यक्ष- किशोर राणे -(हडपीड, तालुका देवगड)
जिल्हा सचिव – अर्जून परब-(माळगांव, तालुका मालवण),
जिल्हा महिला संघटक -सौ.मिलन पार्टे – (कट्टा-नांदोस, तालुका मालवण),
जिल्हा प्रसिद्धी प्रमुख – संजय खानविलकर -(तळेरे, तालुका कणकवली),
जिल्हा संघटक- डॉ.वैभव आईर- (ओरोस-सिंधुदुर्गनगरी, तालुका कुडाळ),जिल्हा महिला संघटक- सौ.शिवानी पाटकर (सावंतवाडी शहर, तालुका सावंतवाडी) अशी जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली. ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध प्रश्नावरती व समस्यांबाबत आवाज उठवून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.त्याच बरोबर जिल्हा व सर्व तालुका संघटना यांच्यामध्ये योग्य समन्वय साधून संघटना वाढीचा विस्तार अधिक व्यापक करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचा विश्वास संघटनेचे नुतन जिल्हाध्यक्ष मंदार काणे यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page