नांदगाव ग्रामपंचायतचे लिपिक
लक्ष्मीकांत मोरजकर यांचे निधन

⚡कणकवली ता.०५-: नांदगाव मोरयेवाडी येथील श्री. लक्ष्मीकांत उर्फ नूतन सुधाकर मोरजकर ( वय ३८) याचे आकस्मिक निधन झाले.
लक्ष्मीकांत मोरजकर
हे नांदगाव ग्रामपंचायत कार्यालयात गेली 15 वर्षे लिपिक या पदावर काम करत असल्याने त्याचा चांगला जनसंपर्क होता. मनमिळाऊ व हसतमुख स्वभावाचे लक्ष्मीकांत नूतन या टोपण नावाने नांदगाव परिसरात परिचित होते. त्याच्या पश्चात वडील, आई, भाऊ, बहीण, काका,काकी,भावजय, भावोजी असा परिवार असून निवृत्त एस.टी.चालक सुधाकर मोरजकर यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते.

You cannot copy content of this page