मनोज मोंडकर, पुनम चव्हाण यांनी भाविकांसाठी केली वाहनाची सोय

प्रभाग ९ मधील नागरिकांना आंगणेवाडीला जाण्या येण्यास झाले सुलभ

मालवण ता.०५-: आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीच्या यात्रेस जाणाऱ्या मालवण शहरातील प्रभाग ९ मधील भाविकांना वाहणाची अडचण भासू नये यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मनोज मोंडकर आणि सौ. पूनम चव्हाण यांच्या संकल्पनेतून खास यात्रा स्पेशल गाड्यांची सोय करण्यात आली होती.

आंगणेवाडी यात्रेस जाणाऱ्या भाविकांना यात्रेस जाणाऱ्या भाविकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट प्रभाग ९ मधून मोफत बससेवेची व्यवस्था आली होती. प्रभाग ९ मधील उद्धव ठाकरे गट कार्यकर्ते मनोज मोंडकर, पूनम चव्हाण, यशवंत गावकर, भाई लुडबे, अमर ढोलम, प्रभाकर लुडबे, शाखाप्रमुख मोहन मराळ, किशोर गावकर, दत्ता पाटकर, बाळा हिंदळेकर आदींच्या उपस्थितीत बस योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

You cannot copy content of this page