सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव :विजय गांवकर

⚡कणकवली ता.०५-: जिल्ह्यातील, तालुक्यातील मुल शिकावीत, मोठी व्हावी आणि ती आपल्या ध्येय धोरणांपर्यंत पोहोचावी. यासाठी नेहमी धडाडीचे प्रयत्न करत असलेले जि. प. माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत व त्यांच्या पत्नी जि.प.सिंधुदुर्गच्या माजी अध्यक्ष संजना सावंत तसेच सावंत कुटूंबीय हे नेहमीच राजकारणापलीकडे समाजाला, शाळकरी मुलांना तसेच इतर गरजुना काहीतरी देण्याचे प्रयत्न करत असतात. २०१८ पासून शालेय विद्यार्थ्यांच्या बौद्धिकतेसाठी काहीतरी नवीन करण्याचा त्यांचा मानस असतो त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रत्नांचा शोध घेणारी सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा सुरू करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव दिला असल्याचे प्रतिपादन पत्रकार विजय गांवकर यांनी केले.
रविवार ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत जिल्ह्यातील २३ परीक्षा केंद्रावर परीक्षा झाली. या परीक्षेत २ री, ३री, ४थी, ६वी, ७वी या इयत्तांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी जिल्हा भरातील २३ केंद्रांवर एकूण ७,५४२ विद्यार्थी सहभागी झाले .सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचे औपचारिक उद्घाटन मुख्य परीक्षा केंद्र – विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली येथे पत्रकार विजय गांवकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले पत्रकार विजय गांवकर यांनी युवा संदेश प्रतिष्ठानच्या उपक्रमांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पुढे बोलताना गावकर म्हणाले, सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षा सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित न रहाता संपूर्ण कोकणात घेण्याचा मानस त्यांनी झालेल्या सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षा उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला. मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी “सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च” परीक्षा बाळगुटी ठरणार आहे. संपूर्ण कोकणच्या विद्यार्थ्यांना या अनमोल उपक्रमाच्या माध्यमातून फायदा होईल, अशा भावना श्री. गांवकर यांनी व्यक्त केल्या

दरम्यान बोलताना संदेश (गोट्या) सावंत म्हणाले की, शैक्षणिक उपक्रमातील शिक्षकांच्या योगदाना बद्दल आभार व्यक्त करतो. कारण शिक्षण क्षेत्रातील कोणतेच काम हे शिक्षकांशिवाय शक्य नाही. आमच्या कार्यात शिक्षकांचा देखील खूप मोठा मोलाचा वाटा आहे. तसेच सिंधुरत्न टॅलेन्ट सर्च परिक्षा सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादीत न राहता येत्या शैक्षणिक वर्षापासून रत्नागिरी जिल्हात देखील ही परीक्षा सुरू करून लवकरच संपूर्ण कोकणात ही परीक्षा सुरू करू असा विश्वास श्री. सावंत यांनी या कार्यक्रमादरम्यान व्यक्त केला.

यावेळी युवा संदेश प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत ,उद्योजक किरण गांवकर, संतोष जाधव, विजय मसुरकर केंद्रप्रमुख, टोनी म्हापसेकर, सुहास सावंत आदी मान्यवर तसेच विद्यार्थी पालकवर्ग उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक एसटीएस परीक्षा प्रमुख सुशांत मर्गज यांनी केले तर सुत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख अडीज लाख रुपयांची बक्षिसे, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच ६ वी व ७ वी मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना लॅपटॉप बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे.

तसेच यावर्षी या परीक्षेची उत्तरपत्रिका ओएमआर पद्धतीची असल्याने संगणकाद्वारे तपासली जाणार आहे. तसेच परीक्षेच्या निकाला दिवशी पालक / शिक्षक / विद्यार्थी यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. अधिक माहितीसाठी एसटीएस परीक्षा प्रमुख सुशांत सुभाष मर्गज यांच्याशी संपर्क साधण्याचे
आवाहन युवा संदेश प्रतिष्ठाचे संस्थापक अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत व अध्यक्षा संजना संदेश सावंत यांनी केले आहे .

You cannot copy content of this page