विद्यार्थ्यांनी समरसतेने क्षेत्र निवडल्यास करिअर साधणे सोपे

माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप

⚡वेंगुर्ले ता.०५-: स्नेहसंमेलनातून विद्यार्थी घडत असतात आपल्यातील कलागुण ओळखून विद्यार्थ्यांनी समरसतेने जर क्षेत्र निवडले तर त्यांना पुढील कालावधीमध्ये करीअर निवडणे सोपे जाते असे प्रतिपादन वेंगुर्ले माजी नगराध्यक्ष मा. दिलीप गिरप यांनी केले.

वेंगुर्ले येथील प्रि. एम. आर. देसाई इंग्लिश मिडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूरचे पेट्रन कौन्सिल मेंबर मा. दौलतराव देसाई यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी माजी नगराध्यक्ष मा. दिलीप गिरप, उद्योजक सचिन वालावलकर, कलावलयचे अध्यक्ष   मा. सुरेंद्र खांबकर, सजंय पुनाळेकर, प्राचार्य डॉ. विलास देऊलकर, प्रा डॉ. आनंद बांदेकर, सुरेंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. 

शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर या संस्थेने प्रि. एम. आर. देसाई इंग्लिश मिडियम स्कूल ही शाळा स्थापन केल्यामूळे गरजू विद्यार्थ्यांना एक संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे आपण या संधीचा फायदा करून घ्यावा व जेवढे ज्ञान विद्यार्थ्यांना घेता येईल त्यासाठी विद्यार्थी व पालकांनी प्रयत्न करावा, असे मा. सचिन वालावलकर यांनी सागिंतले. 
मा. दौलतराव देसाई म्हणाले, येथील पालकांनी आतापर्यंत ठेवलेला विश्वास व केलेले सहकार्य सार्थकी लावण्याचा प्रयत्न करेन, विविध क्षेत्रात यश संपादन केल्याबद्दल  विद्यार्थ्यांचे व पालकांचे कौतूक केले. यानंतर विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी पणे पार पाडले.        
स्वागत सौ. संजया परब, प्रास्ताविक कु. केतकी चेंदवणकर, सुत्रसंचालन कु. निधी पालकर, कु. अदिती चव्हाण  तर आभार  कु. वेदा देसाई  यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
You cannot copy content of this page