संपाच्या सातव्या दिवशी थाळीनाद खणखणला…
⚡ओरोस ता.२०-: राज्य सरकारी ,निमसरकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने पुकारलेल्या जुन्या पेन्शनच्या मागणीसाठीच्या संपाच्या सातव्या दिवशी कर्मचाऱ्यांनी गाणी पोवाडे म्हणून थाळीनाद करत जिल्हा मुख्यालय परिसर दणाणून सोडला. समन्वय समितीचे अध्यक्ष राजन कोरगावकर व सचिव सत्यवान माळवे यांनी सुरुवातीला संपाची सद्यस्थिती विशद करून पुढील काही दिवसांची आंदोलन विषयी नियोजन स्पष्ट केले.संपकऱ्यांनी ‘एकच मिशन,जुनी पेन्शन’ सह…
