आदरांजली वाहत छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी होणार साजरी

उपस्थित राहण्याचे महेश पांचाळ यांचे आवाहन

⚡सावंतवाडी ता.२०-: येथील छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त उद्या छत्रपती संभाजी महाराज चौक सावंतवाडी येथे छत्रपती संभाजी महाराज यांना आदरांजली वहाण्यात येणार आहे. तरी शहरातील तमाम हिंदू बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष महेश पांचाळ यांनी केल आहे.

दरम्यान येताना एक दिवा (पणती) आणावी व हा दिवा छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली असून हिंदू धर्म जागृतीसाठी नवी दिशा देणारा असेल.तरी हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने ठीक ०७ (सात) वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक सावंतवाडी येथे उपस्थित रहावे असे आवाहन शिवधर्म प्रतिष्ठान यांच्यावतीने करणेत आले आहे.

You cannot copy content of this page