मालवणात शासकीय कर्मचाऱ्यांनी छेडले थाळी बजाव आंदोलन

⚡मालवण ता.२०-: जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी राज्यभरातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला असताना ‘एकच मिशन जुनी पेन्शन’ असा नारा देत आज मालवण पंचायत समिती कार्यालयासमोर विविध शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी थाळी बजाव आंदोलन केले. यावेळी उपस्थित शेकडो कर्मचाऱ्यांनी जोरदार थाळ्या वाजवत जुन्या पेन्शनच्या मागणीबाबत सरकारचे लक्ष वेधले.

मालवण पंचायत समिती कार्यालयासमोर एकत्र येत पंचायत समिती मधील कर्मचाऱ्यांसह इतर शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी जोरदार थाळ्या वाजवल्या. अर्ध तास चाललेल्या या आंदोलनात “एकच मिशन, जुनी पेन्शन, हमारी मांगे पुरी करो, अरे बघता काय सामील व्हा, कर्मचारी एकजुटीचा विजय असो, अभि नही तो कभी नही” अशा विविध घोषणा देत कर्मचाऱ्यांनी थाळ्या वाजवल्या. ज्या थाळीतून आम्ही अन्न खातो, त्या थाळ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहचला पाहिजे, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागून झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी उपस्थित कर्मचारी वर्गाने केली.

You cannot copy content of this page