दोडामार्ग तालुक्यात गारमेंट उद्योग आणला जाईल

केंद्रीयमंत्री राणे यांचे यांची तिलारी भेटीत ग्वाही

दोडामार्ग ता.२०-:
दोडामार्ग तालुक्याचा शैक्षणिक दृष्ट्या विकास करण्यासाठी तिलारीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्यापीठ आणण्याबरोबरच येथील बेरोजगारांचा रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता गारमेंट उद्योग आणला जाइल अशी माहिती केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे यांनी तिलारी भेटीदरम्यान दिली.
काही दिवसांपूर्वी तालुक्यातील बेरोजगार युवक युवतीनी एकत्र येत तिलारी विकास मंच च्या माध्यमातून ना.राणे यांची भेट घेत त्यांना तिलारीचा पर्यटन व औद्योगिक विकास करून रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी नुकताच तिलारीचा दौरा केला . त्याअनुषंगाने तिलारीच्या परिसराची पाहणी केल्यावर येथील पर्यटन , शैक्षणिक व औद्योगीक विकासाच्या दृष्टीने पाऊले उचलली जातील असे सांगितले.

You cannot copy content of this page