ओटवणे –
ओटवणे तारीवाडी येथील जितेंद्र (राजू) उत्तम तारी याचा वय 34 याचा दुर्दैवी बुडुंन अंत झाला.दाभिल येथील आकाबाई देवस्थान शेजारील नदीपात्रात ही घटना घडली.
राजू आपल्या मित्रासमवेत मासे पकडण्यासाठी दाभिल येथील नदीपात्रात गेला होता.दुपारी मासे पकडत असताना सुमारे 3 च्या सुमारास बुडून मृत्यू झाला.
बांदा पोलिसांना याची कल्पना दिल्या नंतर सायंकाळी साडे सहा च्या दरम्याने पाण्यातील प्रेत पोलीस च्या माध्यमातून बाहेर काढण्यात आले.उशीरा बांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शव विच्छेदना साठी प्रेत नेण्यात आले.
या प्रकरणाचा अधिक तपास बांदा पोलीस अधिकारी एस जी काळे, पोलीस निरक्षक एस एस भोसले,पोलीस कॉन्स्टेबल व्ही एस जाधव,पोलीस हवालदार मिरजकर करित आहेत.
जितेंद्र बऱ्याच वेळी मासे पकडण्यासाठी या नदीपात्रात जातो. पण आजचा दिवशी काळाने घाला घातला.याच्या पशात वडील,आई, विवाहित बहीण असा परिवार आहे.
