बेकायद वाहतुकीवर पोलिसांची कारवाई
वेंगुर्ले (प्रतिनिधी)-
वेंगुर्ले शहरातील कलानगर येथे रात्री १.३० वाजला आलेल्या व नंबर प्लेट नसलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारला थांबवून गाडीची तपासणी त्यात बेकायदेशीर रित्या वाहातुक केली जाणारी गोवा बनावटीची ४० हजार रूपये किमंतीची दारू सापडला असून स्विप्टकार सह १,४०,००० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वेंगुर्ले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना पांढऱ्या रंगाच्या न नंबरप्लेट नसलेल्या स्विफ्ट कारबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांच्या रो मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल योगेश वेंगुर्लेकर, परशुराम सावंत, ट्रफिक पोलीस पांडुरंग खडपकर, अमर कांडर यांनी रात्री १.३० वाजता वेंगुर्ले शहरातील कलानगर येथे सापळा रचून रात्री १.३० वाजला आलेल्या व नंबर प्लेट नसलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारला थांबविले. या गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये ४० हजार रुपये किंमतीच्या गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या आढळल्या. या प्रकरणी तळवडे मळईवाडी तालुका सावंतवाडी येथील स्विफ्ट कार असा एकूण १ लाख ४० हजार रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी चालक सुधीर श्रीराम आगरवाडेकर (१९) याचेवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ) (ई) ८१ व मोटर वाहन अधिनियम कलम ३ (१), १८१, १३० (१), १७७ अन्वये हा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हेड कॉन्स्टेबल योगेश वेंगुर्लेकर करत आहेत.
