Headlines

उपनगराध्यक्ष फोडून जनमत बदलता येणार नाही

जिल्हाप्रमुख सतीश सावंत: ठेकेदाराचा स्त्रोत कमी झाल्याने भाजपने फोडाफोडी केल्याचा केला आरोप देवगडदेवगड जामसंडे नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १० मध्ये १ कोटीची विकास कामे ही प्रस्तावित प्रसंगी प्रगती पथावर असून नगरपंचायतीमध्ये सत्ता पालटल्यानंतर देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील नागरिकांचे जनमत हे शिवसेना राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या पाठीशी होते. म्हणूनच नगरपंचायती सत्ता बदल झाली .परंतु नुकत्याच…

Read More

गाबीत समाज महोत्सव अंतर्गत क्रिकेट स्पर्धा

देवगड तालुका गाबीत समाजाचे आयोजन देवगडगाबीत महोत्सव २०२३ अंतर्गत तालुकास्तरीय ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा गाबीत समाज देवगड संस्थेच्या वतीने देवगड येथील शेठ म ग हायस्कूलच्या पटांगावर आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये देवगड तालुक्यातील गावीत समाजातील दहा संघाने उत्स्फूर्त सहभाग घेतला यात दिपमंदिर तांबळडेग या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला त्याला रोख रु ५०००/- गाबीत चषक व प्रमाणपत्र…

Read More

मालवण बार असोसिएशन अध्यक्षपदी सतीशकुमार धामापूर

सचिव अक्षय सामंत:सर्वानुमते निवड मालवण दि प्रतिनिधीमालवण तालुका वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ॲड सतिशकुमार धामापूरकर यांची तर सचिवपदी ॲड अक्षय सामंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे मालवण तालुका वकील संघटनेची बैठक आज विद्यमान अध्यक्षा ॲड. माधवी बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीत पुढील तीन वर्षासाठी नूतन कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली त्यात अध्यक्ष म्हणून ॲड…

Read More

सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत प्रांजल आंबेरकर हिचे घवघवीत यश

मसुरे कावा शाळेची विद्यार्थिनी मालवण दि प्रतिनिधी सिंधुरत्न टॅलेन्ट सर्च परीक्षेमधे जिल्हा परिषद शाळा मसुरे कावा ची विद्यार्थिनी कु.प्रांजल अरुण आंबेरकर हीने जिल्ह्यास्तरावर नववा क्रमांक व मालवण तालुक्यात प्रथम येऊन गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. तसेचप्राथमिक शिक्षक समिती आयोजित शिष्यवृत्ती सराव परीक्षेमध्ये इयत्ता पाचवी मधील नंदिनी अरुण आंबेरकर ही मसुरे बिट स्तरावर प्रथम व तालुका…

Read More

तिरवडे ग्राम पंचायत कारभाराची सखोल चौकशी करा

विद्यमान सरपंच, सदस्यांची मागील काळातील कारभार चौकशीची मागणी मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील तिरवडे ग्रामपंचायतीत डिसेंबर २०१७ ते २०२२ या कालावधीत झालेल्या कामकाजाची व आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी तेथील सरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी मालवण गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागील कार्यकारिणीने ग्रामपंचायत खात्यात रक्कम कमी शिल्लक ठेवल्याने अनेकांची बिले देणे…

Read More

आर्थिक वर्षात आर टी ओ ने १३.५६ कोटींचा जमा केला महसूल

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे यांची माहिती ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१८-: उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या 2022-2023 आर्थिक वर्ष 2021-2022 च्या तुलनेत महसूल वसुलीमध्ये 13.56 कोटीची म्हणजेच 32 टक्के इतकी वाढ झाली आहे. त्याशिवाय वाहन नोंदणीमध्ये दुचाकी 2400,चारचाकी 212 तर परिवहन संवर्गात 525 ची वाढ झाल्याची माहिती माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे यांनी दिली आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील…

Read More

नाथ पै नगर, बिजलीनगर येथील रहिवाश्यांना टँकरद्वारे केला पाणीपुरवठा

नगरसेवक सुशांत नाईक, योगेश मुंज यांनी घेतला पुढाकार ⚡कणकवली ता.१८-: गडनदी पत्रातील पाणीसाठा संपल्याने कणकवली नगरपंचायत मार्फत पुरविले जाणारे पाणी काही दिवस बंद ठेवण्यात आले आहे. मात्र कणकवली शहरातील नाथ पै नगर, बिजली नगर येथील काही रहिवाशी हे नगरपंचायतच्या पाण्यावर अवलंबून असल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली. याची माहीती मिळताच शिवसेना गटनेते, नगरसेवक सुशांत नाईक यांनी…

Read More

मुंबई व कणकवलीतून एसटीच्या जादा बसेस सोडाव्यात

प्रमोद मसुरकर व वैभव मालंडकर यांची विभागीय नियत्रकांकडे मागणी ⚡कणकवली ता.१८-: उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरु झाल्यामुळे मुंबईहून कोकणात चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. त्यामुळे मुंबई व कणकवलीतून एसटीच्या जादा बसेस सोडण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कणकवली शहरप्रमुख प्रमोद मसुरकर व उपशहरप्रमुख वैभव मालंडकर यांनी एसटीचे विभागीय नियंत्रक यांच्याकडे केली आहे….

Read More

आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्ययावत करा

तालुकास्तरीय बैठका घेवून यंत्रणा सतर्क करा;निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१८-: प्रांताधिकारी आणि तहसिलदारांनी मान्सूनपूर्व तयारीबाबत तालुकास्तरीय यंत्रणांची बैठक घेवून सतर्क करावे, त्याच बरोबर तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्ययावत करुन सादर करावेत, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केली. मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक आज घेण्यात आली. बैठकीला प्रांताधिकारी जगदीश कातकर, प्रशांत पानवेकर, ऐश्वर्या काळुशे,…

Read More

सर्वांचा सहकार्यामुळे सकारात्मक व लोकभिमुख कारभार करणे शक्य

वैशाली राजमाने;सामाजिक संघटनांकडून वैशाली राजमाने यांचा निरोप सत्कार ⚡कणकवली ता.१८-: तीन वर्षे सात महिन्यांची सेवा स्थगित करून बदलीच्या नवीन जागी हजर होण्यासाठी जाणाऱ्या तत्कालीन कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली मोहन राजमाने यांचा निरोप समारंभ प्रसंगी शुभेच्छा देण्यात आल्या. आम्ही कणकवलीकर, कणकवली तालुका व्यापारी संघ, रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल, कणकवली औषध विक्रेता संघटना, स्नेहसिंधू कृषी पदवीधर…

Read More
You cannot copy content of this page