उपनगराध्यक्ष फोडून जनमत बदलता येणार नाही

जिल्हाप्रमुख सतीश सावंत: ठेकेदाराचा स्त्रोत कमी झाल्याने भाजपने फोडाफोडी केल्याचा केला आरोप

देवगड
देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १० मध्ये १ कोटीची विकास कामे ही प्रस्तावित प्रसंगी प्रगती पथावर असून नगरपंचायतीमध्ये सत्ता पालटल्यानंतर देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील नागरिकांचे जनमत हे शिवसेना राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या पाठीशी होते.

म्हणूनच नगरपंचायती सत्ता बदल झाली .परंतु नुकत्याच झालेल्या देवगड जामसंडे नगरपंचायत येथील उपनगराध्यक्ष मिताली सावंत यांनी भाजपला समर्थन दिले असले तरी देवगड जामसंडे परिसरात जनतेचे जनमत ते महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे. या नगरपंचायतीमधील ठेकेदारीचे स्तोत्र कमी झाल्याने उपनगराध्यक्ष अथवा नगरसेवक फोडून सत्ता काबीज करण्याची भाजपची स्वप्न पूर्ण होणार नाहीत. उलट त्यामुळे भाजपा विरोधी असलेले जनमत बदलता येणार नाही .अशी प्रतिक्रिया सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी देवगड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
देवगड जामसडे नगरपंचायतीच्या विद्यमान उपनगराध्यक्ष मिताली सावंत यांनी देवगड जामसंडे नगरपंचायत महाविकास आघाडीला सोडचिट्टी देऊन देवगड जामसांडे नगरपंचायत समिती या भाजपा गटाला समर्थन दिले. त्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी देवगड येथे येऊन शिवसेना पदाधिकारी आणि सत्ताधारी शिवसेना नगरसेवक नगराध्यक्ष यांच्याशी सुसंवाद साधला व सविस्तर चर्चा केली .आणि पत्रकारांशी सुसंवाद साधला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, देवगड जामसंडे नगरपंचायतीमधील सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक रोहन खेडेकर या एका गरीब सर्वसामान्य माणसाने धन दांडग्या बलाढ्य माजी नगराध्यक्षाला पराभूत केले .या द्वेशापोटी रोहन खेडेकर यांच्यावर अनधिकृत बांधकाम केले अशी तक्रार करून त्यांच्यावर अपात्रेची कारवाई करण्यात आली हे पक्षपाती धोरण भाजप करीत असून त्याने घर बांधणी परवानगी मागितली असता त्याला विलंब केला व ते बांधकाम अनधिकृत आहे अशी तक्रार केली देवगड जामसांडे नगरपंचायत हद्दीत अनेक अनधिकृत बांधकामे असली तरी येथील जनतेच्या आपण कोणतीही अनधिकृत बांधकामाबाबत तक्रार करणार नसल्याचे सतीश सावंत यांनी सांगून वैभववाडी येथील अनधिकृत बांधकामाबाबत गेल्या वर्षभरापूर्वी तक्रारी करून देखील त्याच्याकडे दुर्लक्ष करून जिल्हा प्रशासनाने देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील नगरसेवक रोहन खेडेकर यांचे अनधिकृत बांधकाम बाबत तातडीने पक्षपाती पणे निर्णय दिला व अपात्र ठरविले. नोकरीवरून काढण्याची देखील प्रक्रिया सुरू असून रोहन खेडेकर यांना सदस्य पदावरून अपात्र केले तरी जनतेच्या हृदयातील जागा त्यांची जागा कुणालाही घेता येणार नाही. देवगड जमसांडे नगरपंचायतीमध्ये सुडाचे राजकारण यापूर्वी माजी आमदार आप्पासाहेब गोगटे अथवा अजित गोगटे यांच्या कारकीर्दीत कधीही केले जात नव्हते व कधीही खालची पातळी गाठली जात नव्हती परंतु तर नंतरच्या काळात आलेल्या भाजपच्या नेत्यांनी आमदारांनी सुडाचे राजकारण सुरू केले आहे जो पक्षात येणार नाही त्याला राजकारणातून संपायचे परंतु जनतेच्या मनातले उत्तर लोकशाही मार्गाने येथील जनता दिल्याशिवाय राहणार नाही. शिवसेनेचे गटनेते संतोष तारी यांचा व्हीप नगरपंचायत मधील महाविकास आघाडीच्या सर्वच्या सर्व ९ सदस्यांना पाळावा लागेल त्याचे पावित्र्य राखावे लागेल कारण हा गट ९सदस्यांचा नोंदणीकृत गट असून योग्य वेळी नोंदणीकृत गटाच्या कायदेशीर बाबी ही तपासले जातील .सत्तेचा गैरवापर करण्याचा जरी प्रयत्न केला तरी येथील जनतेचे जनमत हे महाविकासच आघाडीच्या बाजूने राहील व त्याची प्रचिती २०२४ च्या ही निवडणुकी दिसल्याशिवाय राहणार नाही. अनधिकृत बांधकामच्या तक्रारीबाबत जिल्हा प्रशासनाने ३० जून पर्यंत योग्य ती कारवाई न केल्यास जिल्हा प्रशासनाचे विरोधात आंदोलन करण्यात येईल. प्रसंगी न्यायालयीन लढाई लढण्यात येईल आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण देवगड तालुक्यात लढविले जातील व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य हे सर्व महाविकास आघाडीचेच विजयी होतील असा विश्वास जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी व्यक्त करून एक मे पासून शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणी मोहिमेस सुरुवात करण्यात येणे असल्याचे सांगितले.

You cannot copy content of this page