गाबीत समाज महोत्सव अंतर्गत क्रिकेट स्पर्धा

देवगड तालुका गाबीत समाजाचे आयोजन

देवगड
गाबीत महोत्सव २०२३ अंतर्गत तालुकास्तरीय ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा गाबीत समाज देवगड संस्थेच्या वतीने देवगड येथील शेठ म ग हायस्कूलच्या पटांगावर आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये देवगड तालुक्यातील गावीत समाजातील दहा संघाने उत्स्फूर्त सहभाग घेतला यात दिपमंदिर तांबळडेग या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला त्याला रोख रु ५०००/- गाबीत चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत व्हीआरसीची आनंदवाडी ,अ व ब,संघ तारा स्पोर्ट्स तारामुंबरी , दीप मंदिर तांबळडेग, यंगस्टार बिरवाडी कट्टा क्लब कट्टा अ व ब संघ डब्लू एनसीसी वडप ,किनारा बागवडी व आडबंदर या संघाने सहभाग घेतला. अंतिम प्रवेश मिळून दिला गाबीत समाज देवगड आयोजित या क्रिकेट स्पर्धेत क् दीप मंदिर तांबळडेग व व्ही आरसीसी व आनंदवाडी यांचे अंतिम सामना झाला यात दीपमंदिर तांबळडेग या संघाने प्रथम विजेतेचा किताब पटकावून रोख रु५०००/-व गाबीत चषक आणि प्रमाणपत्र मिळविली.तर उपविजेता व्हीआरसीसी आनंदवाडी संघाने रोख रु ३०००/- व गाबीत चषक,प्रमाणपत्र प्राप्त केले. तिसरा क्रमाक यंगस्टार विरवाडी रोख रु २०००/- गाबीत चषक प्रमाणपत्र ,स्पर्धेतील मालिकाविर कौशिक जोशी,याला ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.उत्कृष्ट फलदाज केदार धुरी,उत्कृष्ट गोलंदाज तन्मय बांदेकर,याना निवडण्यात आले.रोख रकमेची पारितोषिक सूर्यकांत खवळे यांनी प्रायोजित केली होती.समालोचक म्हणून उत्तम मुंणगेकर , परेश सनये विकी कडू हार्दिक कुबल रुत्विक धुरी यांनी काम पाहिले तर पंच म्हणून निषाद हिरनाईक, बबन ढोके नाना निवतकर सुजय मुंडेकर सुमित कोयंडे वैभव धुरी नितीन कोयंडे यांनी मेहनत घेतली सामन्याची गुणधिक बंटी धुरी सज्जन झांजम व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जागृत जोशी निशाद हिरनाईक , रुपेश जोशी आणि त्यांचे सर्व गाबीत समाज मित्र मंडळ गाबीत समाज देवगड संस्थेचे पदाधिकारी यांनी सहकार्य केले यावेळी देवगड फिशरमेन्स संस्थेचे द्विजकांत कोयंडे किशोर कुबल, दिनेश पोसम गाबीत समाज अध्यक्ष संजय पराडकर उपाध्यक्ष लक्ष्मण तारी सचिव संजय बांदेकर सहसचिव सुहास पराडकर खजिनदार अजित टाककर, पदाधिकारी सदस्य दत्ताराम कोयंडे ,धर्मराज जोशी संदीप डोळकर बाळू बांदेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page