⚡मालवण ता.१८-: मुंबई उच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या निर्देशानुसार दि. ३० एप्रिलला सकाळी साडेदहा वाजता मालवण येथील दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आले आहे.
या लोक अदालतीमध्ये दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणी तसेच बँका, बीएसएनएल, महावितरण कंपनी, ग्रामपंचायतकडील वाद पूर्व जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी ठेवण्यात आली आहे. या लोक अदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मालवण तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा क स्तर दिवाणी न्यायाधीश यांनी केले आहे.
