प्रमोद मसुरकर व वैभव मालंडकर यांची विभागीय नियत्रकांकडे मागणी
⚡कणकवली ता.१८-: उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरु झाल्यामुळे मुंबईहून कोकणात चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. त्यामुळे मुंबई व कणकवलीतून एसटीच्या जादा बसेस सोडण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कणकवली शहरप्रमुख प्रमोद मसुरकर व उपशहरप्रमुख वैभव मालंडकर यांनी एसटीचे विभागीय नियंत्रक यांच्याकडे केली आहे. या मागणीची दखल घेत १९ एप्रिलपासून जादा गाडी सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या उन्हाळी व शालेयसुट्टया सुरु झाल्यामुळे कोकणातून मुंबईकडे सुट्टीनिमित्त जाणाऱ्या लोकांचा ओघ वाढला आहे. मुंबईहून कोकणात चाकरमानी दाखल होत आहेत. त्यामुळे कोकणातून मुंबईकडे व
मुंबईहून कोकणाकडे
येणाऱ्यांसाठी नियमित दोन एसटीच्या बसेस सोडण्यात यावेत. त्यातील एक फेरी सकाळी कणकवली ते मुंबई सोडण्यात यावी. तर संध्याकाळीएक बस सोडून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी केली होती. या मागणीची विभाग नियंत्रणाकांनी त्वरित दखल घेत उद्यापासून दोन फेऱ्या सुरु
करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
