सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत प्रांजल आंबेरकर हिचे घवघवीत यश

मसुरे कावा शाळेची विद्यार्थिनी

मालवण दि प्रतिनिधी

सिंधुरत्न टॅलेन्ट सर्च परीक्षेमधे जिल्हा परिषद शाळा मसुरे कावा ची विद्यार्थिनी कु.प्रांजल अरुण आंबेरकर हीने जिल्ह्यास्तरावर नववा क्रमांक व मालवण तालुक्यात प्रथम येऊन गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. तसेच
प्राथमिक शिक्षक समिती आयोजित शिष्यवृत्ती सराव परीक्षेमध्ये इयत्ता पाचवी मधील नंदिनी अरुण आंबेरकर ही मसुरे बिट स्तरावर प्रथम व तालुका स्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.शिक्षक भारती संघटना आयोजित शिष्यवृत्ती सराव परीक्षेमध्ये सुद्धा नंदिनी ही मसुरे बिट स्तरावर प्रथम व तालुका स्तरावर गुणवत्ता यादीत आली आहे.प्राथमिक शिक्षक संघामार्फत द स्कॉलर ऑफ सिंधुदुर्ग अवॉर्ड परीक्षेमध्ये नंदिनी ही तालुक्यात सातवी आली आहे. दोघीही भगिनींना मुख्याध्यापिका सौ सुखदा मेहेंदळे व सुहास गावकर यांचे मार्गदर्शन लाभले. शाळा समिती अध्यक्ष पंढरीनाथ मसुरकर यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page