तिरवडे ग्राम पंचायत कारभाराची सखोल चौकशी करा

विद्यमान सरपंच, सदस्यांची मागील काळातील कारभार चौकशीची मागणी

मालवण (प्रतिनिधी)

मालवण तालुक्यातील तिरवडे ग्रामपंचायतीत डिसेंबर २०१७ ते २०२२ या कालावधीत झालेल्या कामकाजाची व आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी तेथील सरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी मालवण गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मागील कार्यकारिणीने ग्रामपंचायत खात्यात रक्कम कमी शिल्लक ठेवल्याने अनेकांची बिले देणे बाकी आहे. कर्मचारी पगार १५ टक्के व ५ टक्के निधीतून करायचा खर्च बाकी आहे मात्र ग्रामपंचायतीकडे पैसे नाहीत, असे अनेक मुद्दे सहाय्यक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्याकडे ग्रामस्थांनी मांडत त्यामुळे आर्थिक व्यवहारांची चौकशी होणे गरजेचे वाटते, असेही ग्रामस्थानी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा बँक संचालक बाबा परब, सरपंच रेश्मा गावडे, उपसरपंच सुशील गावडे, सदस्या विशाखा गावडे, सुमित मेस्त्री, विनया गावडे, तिरवडे भाजपचे गाव अध्यक्ष रामचंद्र उर्फ दाजी सावंत व काही ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page