माझी वसुंधरा अभियानामध्ये वेंगुर्ला नगरपरिषद कोकण विभागात प्रथम
तर राज्यात दहावी; एक कोटींचे बक्षिस पटकाविले… ⚡वेंगुर्ला ता.०५-: वेंगुर्ला नगरपरिषदेने माझी वसुंधरा अभियान तिसरे पर्व (२०२३) मध्ये कोकण विभागीय स्तरावर प्रथम क्रमांकासहीत १ कोटी रुपयांचे बक्षिस पटकाविले आहे. तर राज्यात दहावा क्रमांक आला आहे. या क्रमांकामुळे वेंगुर्ला नगरपरिषदेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
