Headlines

शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय निर्णय नको…

शक्तीपीठ महामार्गाविरोधात संयुक्त लढ्याचा निर्धार: प्रांतअधिकाऱ्यांना ठाकरे शिवसेना व मनसेच निवेदन..

⚡बांदा ता.०९-: प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवत ठाकरे शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्या संयुक्त वतीने गुरुवारी प्रांताधिकारी कार्यालयात हरकत नोंदविण्यात आली. शेतकऱ्यांच्या जमिनी, शेती व पर्यावरणाचे नुकसान होणार असल्याने या महामार्गाला तीव्र विरोध असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी विरसिंग वसावे यांना निवेदन सादर करण्यात आले. या प्रसंगी बांदा ग्रामपंचायत सदस्य तथा ठाकरे शिवसेना शहरप्रमुख साईप्रसाद काणेकर, मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, ठाकरे शिवसेना उपविभागप्रमुख ओंकार नाडकर्णी तसेच भाऊ वाळके उपस्थित होते.
दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी, शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहणार असून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संयुक्तपणे लढा सुरू ठेवू, असा निर्धार व्यक्त केला. तसेच शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये आणि त्यांच्या हरकतींचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
फोटो:-
सावंतवाडी प्रांताधिकारी विरसिंग वसावे यांना निवेदन देताना ठाकरे शिवसेना व मनसेचे पदाधिकारी.

You cannot copy content of this page