Headlines

संदीप बांदेकर यांच्या पाठपुराव्याने बांदा–निमजागा मार्गावरील धोकादायक लोखंडी जाळी हटवली…

⚡बांदा ता.०९-: बांदा येथील इंडियन गॅस एजन्सी शेजारील बांदेकरवाडी–निमजागवाडीकडे जाणाऱ्या राज्य मार्गावरील रस्त्याच्या मध्यभागी बसविण्यात आलेली लोखंडी जाळी वाहनांच्या ये-जा दरम्यान मोठा आवाज निर्माण करत होती. त्यामुळे रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. या समस्येची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा मंडल सदस्य संदीप बांदेकर यांनी संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधून तातडीने लोखंडी जाळी काढून त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटने भराव करण्यास भाग पाडले. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
याचवेळी गडगेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगतची खचलेली साईडपट्टीही तात्पुरत्या स्वरूपात खडी टाकून भरून घेण्यात आली असून, लवकरच तिची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, याच परिसरातील पाणीपुरवठ्याच्या फुटलेल्या नळजोडणीचीही ग्रामपंचायतीचे उपसरपंच रत्नाकर आगलावे यांच्याशी संपर्क साधून तातडीने दुरुस्ती करण्यात आली. तसेच नळ फुटल्यामुळे निर्माण झालेला मोठा खड्डाही भरून घेण्यात आला. या पाहणी व दुरुस्तीच्या वेळी गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर शैलेश बांदेकर सावंत यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
फोटो:-
बांदा निमजगा येथे मुख्य रस्त्यावर काँक्रिट टाकल्याने समाधान व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page