⚡वेंगुर्ला ता.०५-: ओरीसा राज्यातील बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस व मालगाडी यांच्यात झालेल्या भिषण अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींना सिधुदुर्ग जिल्हा काँग्रेसतर्फे वेंगुर्ला येथे मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, वेंगुर्ला तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विधाता सावंत, शहर अध्यक्ष प्रकाश डिचोलकर, माजी नगरसेवक दादा सोकटे, संकेत वेंगुर्लेकर, स्वदिप परब, साईश परब आदी उपस्थित होते. दरम्यान, अपघातामध्ये जे जखमी झाले आहेत त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
फोटोओळी – जिल्हा काँग्रेसतर्फे रेल्वे अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
