नव्या पीढीला आदर्श सांगणारे संस्कार गीत सादर
⚡कणकवली ता.०५-: चूल आणि मुल याच्या पलीकडे जाऊन भिरवंडे गावामधील महिलांनी एक सुमधुर गौरव गीत सादर केले आहे. सोशल मिडीयावर सध्या ते व्हायरल झाले आहे. याची संकल्पना गीत आणि संगीतकार श्रीकृष्ण सावंत यांनी मांडली आहे. गावातील महिलांचे कलागुण अचूक हेरण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. महिलांनी सुद्धा उदंड प्रतिसाद दिला. भिरवंडे गावचे निसर्ग सौंदर्याचे विलोभनीय चित्रीकरण, श्रीदेव रामेश्वर मंदिरामधील हरिनाम सप्ताह, दिर्बादेवी माऊलीचे दर्शन,या गीतांमध्ये घडते.
एक आदर्श गाव म्हणून या गावाची ओळख आहे. गावातील महिलांनी हे गीत गायले असून त्यांचेच नृत्य अत्यंत मनाला भावते आहे.
सर्वत्र या गीताची चर्चा सुरू आहे. श्रीकृष्ण सावंत आणि गावामधील सर्व महिला याचे कौतुक होच आहे. वटपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर हे गीत सुदर्शन मुझीक च्या युटूब चॅनलवर रिलीज करण्यात आले. गेल्या दोन दिवसाता या गीताला मोठ्या प्रतिसाद मिळाल आहे. ग्रामीण भागातील महीलांना या गौरव गीतमध्ये सहभागी करूण घेण्यात आले. काही मुंबईतील महीला यात सहभागी आहेत. गावातील वर्षेभर होणारे विविध सन, उत्सवाबरोबर निसर्गातील विविध बदल, गावातील नैसर्गीक साधन संपत्ती, पावळ्यातील दृष्य या गीताच्या माद्यमातून जगभर पोहचत आहे. ऐतिहासीक, सामाजिक आणि राजकीय वारसा लाभलेल्या भिरवंडे गावात आज खाससदार अरविंद सावंत, आमदार विक्रम सावंत राजकिय पटलावर आहेत. या गावाला सैन्य दलातील उच्चअधिकरी देण्याची एक परंपरा आहे. वैद्यकिय सेवेतील तज्ञ, उद्योजक, प्रशासकिय अधिकारी, पोलिस अधिकारी, नाट्य सृष्टीतील कलाकार, भजनी कलाकार अशी वेग- वेगळ्या क्षेत्रात नावरूपाला आलेली मंडळी या गावात आहे. या गीताच्या माद्यमातून ही भिरवंडे गावची ओळक जगापुढे मांडली आहे.
