⚡बांदा ता.०५-: समाजात व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्तीत काम करणारे येथील सामाजिक कर्यकर्ते अस्लम महंमदसाब खतीब यांना समर्थ सोशल फौंडेशन व न्यूट्रीफील हेल्थ कोल्हापूर यांच्यावतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय ‘व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
रविवार दिनांक २५ जून रोजी हॉटेल अत्रिया, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. समाजातील व्यसनी व मधुमेह असणाऱ्या लोकांना व त्यांच्या कुटुंबाला या त्रासातून बाहेर पाडण्यासाठी सेवाभावी वृत्तीने मदत करून त्या कुटुंबाला नवसंजीवनी देण्याचे काम खतीब यांनी केल्याने याची दखल घेत त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
‘व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत’ पुरस्काराने होणार अस्लम खतीब यांचा सन्मान…
