Headlines

तांबोळीत विजेचा लपंडाव; ग्रामस्थ संतप्त

गणेशोत्सवापूर्वी वीजपुरवठा सुरळीत न केल्यास बांदा महावितरण कार्यालयावर धडक देण्याचा इशारा बांदा/प्रतिनिधीतांबोळी गावात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वीजपुरवठ्याचा लपंडाव सुरू असून, वारंवार वीज खंडित होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. काल गोकुळाष्टमीच्या दिवशीही दिवसभर वीज गायब राहिल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली. विशेषतः उपवासाचा स्वयंपाक करताना गृहिणींना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर…

Read More

विलवडेतील सर्व क्वारी बुजवून पर्यावरणाची हानी भरून काढावी

सामाजिक कार्यकर्ते गुणेश गवस यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; दहा दिवसांत भेट घेणार बांदा/प्रतिनिधीसावंतवाडी तालुक्यातील विलवडे गावातील क्वारींमुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा ऱ्हास झाला असून, येथील सर्व क्वारी बुजवून उत्खननामुळे झालेली पर्यावरणाची हानी भरून काढावी, अशी मागणी वाफोली येथील सामाजिक कार्यकर्ते गुणेश गवस यांनी केली आहे. यासंदर्भात येत्या दहा दिवसांत सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार असल्याचे…

Read More

सावंतवाडीत ९ सप्टेंबरला भाजपची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी…

प्रभाकर सावंत यांची माहिती: प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणेंसह दिग्गज नेते राहणार उपस्थित.. ⚡सावंतवाडी, ता. ५-: भारतीय जनता पक्षाची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी बैठक येत्या ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार…

Read More

कुडाळमध्ये अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचा आदेश…

कुडाळ बाजारपेठ व कुडाळ-मालवण मार्गावर अवजड वाहतुकीला प्रतिबंध:एसआरएम कॉलेज–एमआयडीसी मार्गे वाहतूक वळविणार.. ⚡कुडाळ ता.०५-: गणेशोत्सवाच्या पार्शवभूमीवर कुडाळ शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील अवजड वाहतूक मुख्य बाजारपेठेतून न आणता पर्यायी मार्गाने वळविण्याचा आदेश जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जारी केला आहे. मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम ११५ अन्वये हा आदेश पुढील आदेश…

Read More

जि. प. शाळांच्या विकासासाठी अनिल निरवडेकर सरसावले; दोन शाळा घेतल्या दत्तक…

⚡सावंतवाडी ता.०५-: भारतीय जनता पार्टीचे सावंतवाडी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी सावंतवाडी शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ४, शाळा क्रमांक ५ दत्तक घेतली आहे. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून निरवडेकर यांनी या शाळांमध्ये विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम हाती घेतले आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी ही घोषणा केली असून तळवणे…

Read More

१४ ते २५ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात लेझर लाईट व बीम्स उपकरणांच्या वापरास मनाई

सिंधुदुर्गनगरी, दि. ५ सप्टेंबर : गणेशोत्सवाच्या कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात लेझर लाईटचा वापर करण्यात येण्याची शक्यता असते. लेझर लाईट डोळ्यांवर पडल्याने वृद्ध व्यक्ती, लहान मुले तसेच किशोरवयीन व्यक्तींच्या डोळ्यांना इजा होऊन दृष्टीदोष निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ अन्वये…

Read More

जिल्ह्यात मनाई आदेश लागू

सिंधुदुर्ग 05 :- जिल्ह्यात विविध आंदोलने, सण, उत्सवाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (अ) ते (फ), ३७ (३) नुसार दिनांक – ०५ सप्टेंबर २०२६ रोजी ००.०१ ते दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी २४.०० वा पर्यत जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी खालील कृत्य करण्यांस मनाई…

Read More

कुडाळ गणेश घाटाचे सोमवारी लोकार्पण…

भंगसाळ नदीकाठच्या परिसराचे सुशोभीकरण:ना. नितेश राणे, आ. निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती.. ⚡कुडाळ ता.०५-: कुडाळ नगरपंचायत हद्दीतील भंगसाळ नदीकाठच्या गणेश घाट बांधकामासह परिसर सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले असून, या विकासकामाचा लोकार्पण सोहळा सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता भंगसाळ नदी बंधाऱ्याजवळ आयोजित करण्यात आला आहे.नवीन नगरपंचायत सहाय्य अनुदान आणि प्रादेशिक पर्यटन विकास…

Read More

जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांचा राजीनामा

सेवामुक्तीनंतर वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी पद्धतीने सेवा बजावणार कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी आपल्या शासकीय पदाचा राजीनामा दिला असून, शासकीय सेवेतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सेवामुक्तीनंतर वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी (कॉन्ट्रॅक्ट बेसिस) पद्धतीने वैद्यकीय सेवा बजावणार असल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.डॉ. श्रीपाद पाटील हे कुडाळ येथे वास्तव्यास असून, गेल्या अनेक…

Read More

श्रीकृष्णाच्या प्रतिमेचा गैरवापर रोखण्यासाठी विराज परब यांचे पालकमंत्र्यांना निवेदन…

धान्याच्या पिशव्यांवरील धार्मिक चित्रांच्या वापराबाबत योग्य कारवाईची मागणी.. ⚡बांदा ता.०५-:धान्य व इतर खाद्यपदार्थांच्या पिशव्यांवर भगवान श्रीकृष्णाचे चित्र छापण्यात येते. मात्र, धान्य संपल्यानंतर या पिशव्यांचा कचरा, मासे वाहतूक तसेच इतर कारणांसाठी वापर होत असल्याने धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी भाजप सोशल मीडिया बांदा मंडळ संयोजक विराज…

Read More
You cannot copy content of this page