तळवडा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मला साथ द्या…

संदीप गावडे: मतदारसंघात प्रचारात घेतले जोरदार आघाडी…

सावंतवाडी ता.०३-: तळवडा जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संदीप गावडे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून त्यांचा डोअर-टू-डोअर प्रचार सध्या जोमात सुरू आहे. त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

संदीप गावडे हे तळवडा मतदारसंघातून निवडणूक लढवत असून प्रचारादरम्यान ते थेट नागरिकांशी संवाद साधत आहेत. भारतीय जनता पक्षाचे विचार मतदारांपर्यंत पोहोचवताना त्यांनी आतापर्यंत झालेल्या विकासकामांचा आढावा दिला तसेच आगामी काळातील विकासात्मक मुद्दे मांडत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, आपल्या मतदारसंघातील विविध समस्या निवडणुकीनंतर प्राधान्याने सोडविण्यात येतील, असा विश्वासही त्यांनी उपस्थित नागरिकांना दिला. “तुम्ही मला एकदा साथ द्या, मी सदैव तुमच्या पाठीशी उभा राहीन,” अशी भावनिक हाक देत त्यांनी मतदारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

You cannot copy content of this page