मंत्री ना. नितेश राणे यांची आज आडेली जि. प. मतदारसंघात जाहीर सभा…

⚡वेंगुर्ला ता.०३-: वेंगुर्ला तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद मतदारसंघात आडेली येथे आज मंगळवारी रात्री 8 वाजता महायुतीची भव्य जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. आडेली जि. प. मतदारसंघातून समिधा समीर नाईक, आडेली पं. स. मतदारसंघातून नितीन मांजरेकर व वायंगणी पं. स. मतदारसंघातून शीतल राऊत या उमेदवा्रांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मत्स्य व बंदर विकास मंत्री व पालकमंत्री ना. नितेश राणे, आमदार दिपक केसरकर, आ. निलेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आदीसह महायुतीचे तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब यांनी केले आहे.

You cannot copy content of this page