⚡वेंगुर्ला ता.०३-: वेंगुर्ला तालुक्यातील 5 जिल्हा परिषद व 9 पंचायत समिती साठी शनिवार 7 फेब्रुवारी रोजी संबंधित मतदान केंद्रावर सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासनातर्फे वेंगुर्ला तालुक्यातील सर्व 5 ही जिल्हा परिषद गट व 9 पंचायत समिती गण यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एकच बॅलेट युनिट (Ballot Unit) वापरण्यात येणार असून एकाच
बॅलेट युनिट वर 2 मते नोंदवावी लागणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दिली. मतदारांनी या एकाच बॅलेट युनिटवर मतदान करावयाचे आहे. जिल्हा परिषद साठी 1 व पंचायत समिती साठी 1 अशी 2 मते नोंदवायची आहेत. जिल्हा परिषद मतदान साठी मतपत्रिका ही पांढऱ्या रंगाची आणि पंचायत समिती मतदान साठी मतपत्रिका ही गुलाबी रंगाची असणार आहे. 1 मत जिल्हा परिषद उमेदवारासाठी व 1 मत पंचायत समिती उमेदवारासाठी नोंदविल्याशिवाय मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
मतदारांनी मतदान करताना बॅलेट युनिटवरील चिन्हे व पर्याय काळजीपूर्वक पाहून आपले जिल्हा परिषदकरिता 1 मत व पंचायत समितीकरिता 1 मत, असे मतदान करावे. मतदान प्रक्रियेसाठी ओळखपत्र वापरून शिस्तबद्ध पद्धतीने मतदान करावे. सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन ओंकार ओतारी यांनी केले आहे.
जि. प. व पं. स. साठीएकाच बॅलेट युनिटवर दोन मते ; ओंकार ओतारी…
