आडवली–मालडी मतदारसंघात सोनाली घाडीगांवकर यांचा डोअर टू डोअर प्रचार जोरात

⚡मालवण,ता.०३-:
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असून गावागावात प्रचाराला वेग आला आहे. तालुक्यातील आडवली मालडी मतदार संघात महायुतीच्या उमेदवार सोनाली घाडीगांवकर यांनी डोअर टू डोअर प्रचारावर भर दिला आहे. मतदार संघाच्या विकासासाठी त्यांना मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवून देऊ असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

आडवली मालडी मतदार संघ हा खासदार नारायण राणे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदार संघावर सोनाली घाडीगांवकर यांचे पती सुनील घाडीगांवकर यांचे गेली बरीच वर्षे वर्चस्व राहिले आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत या मतदार संघाने महायुतीला मोठे मताधिक्य मिळवून दिले आहे.
आडवली मालडी मतदार संघात महायुतीच्या उमेदवार म्हणून सोनाली घाडीगांवकर या निवडणूक रिंगणात आहेत. या मतदार संघात निरोम, मठबुद्रुक, बुधवळे, कुडोपी, श्रावण, रामगड, गोठणे, किर्लोस, असगणी, राठीवडे, घाडीवाडी, हिवाळे, शिरवंडे, असरोंडी, ओवळीये या गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये सोनाली घाडीगांवकर यांनी घरोघरी प्रचारावर भर देत मतदार संघाच्या विकासात्मक कामांवर लक्ष केंद्रित केले आहे. महाविकास आघाडीच्या काळात या मतदार संघातील अनेक विकासात्मक कामे प्रलंबित राहिल्याने त्याचा फटका सर्वसामान्य ग्रामस्थांना सहन करावा लागला आहे. राज्यात, केंद्रात एकाच विचारांच्या पक्षाची सत्ता असल्याने आणि खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून तालुक्यात विकासाची गंगा आली आहे. विकासकामांची ही गती यापुढेही कायम राहण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे असा विश्वास कार्यकर्त्यांकडून मतदारांना दिला जात आहे.

You cannot copy content of this page