⚡सावंतवाडी ता.०३-: बुधवारी श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी ( स्वायत्त) येथे मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने उडान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले, मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. बळीराम गायकवाड, तसेच डॉ. कुणाल जाधव आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महोत्सवामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 15 महाविद्यालय सहभागी होणार असून या महोत्सवा अंतर्गत पथनाट्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, भित्तीचित्रे स्पर्धा, आणि सृजनशील लेखन या स्पर्धा संपन्न होणार आहे या महोत्सवामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पंधरा महाविद्यालयातील सुमारे 250 विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या उडान महोत्सव २०२६ चे श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे आयोजन…
