Headlines

वेदांत वायंगणकरची विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड

⚡कणकवली ता.१७-: जिल्हा क्रीडा अधिकारीकार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे १४ सप्टेंबर रोजी झाली. यामध्ये कासार्डे ज्युनिअर कॉलेजचा वेदांत विनायक वायंगणकर याने यश संपादन केले. त्याची रत्नागिरी येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वेदांत वायंगणकर याने १९ वर्षांखालील मुलांच्या गटात खेळताना जिल्ह्यात चतुर्थ क्रमांक पटकाविला….

Read More

मुबंई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री.बोरकर यांचं जिल्हा वकील संघटनेच्या वतीने स्वागत…

⚡सावंतवाडी ता.१७-: मुबंई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालक न्यायमूर्ती श्री.नितीन बोरकर हे जुडीशियल वर्कशॉप करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असता त्यांची जिल्हा वकील संघटनेच्या वतीने सदिच्छा भेट घेऊन त्यांचं सहर्ष स्वागत करण्यात आलं. सदर प्रसंगी जिल्हा प्राधान न्यायाधीश श्री. संजय भारूका ,जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोवा चे माजी उपाध्यक्ष…

Read More

गणपतीची आरास करत असताना शॉक लागून सरमळे येथील रमाकांत परब यांचे निधन …

⚡बांदा ता.१८-:    गणपतीची आरास करत असताना शॉक लागून सरमळे देऊळवाडी येथील रमाकांत शिवराम परब (वय ५०) यांचे निधन झाले. ही घटना आज सकाळी ९ वाजता घडली. रमाकांत हे घरात गणपतीची आरास करत होते. टेबलवर चढून ते वायरिंग करत होते. त्यावेळी शॉक लागल्याने ते तोल जाऊन खाली जमिनीवर पडले. त्यांना तात्काळ उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य आणण्यात…

Read More

एटीएम मधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने फसवणूक…

कसाल येथील घटना:दोन अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल ओरोस ता १७मालकाच्या समोरच त्याचे ए टी एम कार्ड वेळोवेळी मशीनमध्ये टाकून येणारे पैसे बोटाच्या साहाय्याने अडवून ठेवत ४९ हजार ५०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार कसाल येथील सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ए टी एम कार्डमध्ये घडला आहे. या प्रकरणी दोन अज्ञात व्यक्ती विरोधात सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा…

Read More

चाकरमान्यांचे स्वागत करण्याचा कणकवली तालुका प्रवासी संघाचा उपक्रम स्तुत्य

तहसीलदार दीक्षांत देशपांडे; संघाला सर्व प्रकारचे सहकार्य ⚡कणकवली ता.१७-: कोकणातील महाउत्सव असलेला गणेशोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी लाखोंच्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत. त्यांचे स्वागत करण्याचा कणकवली तालुका प्रवासी संघाचा उपक्रम स्तुत्य असून प्रवाशांच्या विविध प्रश्न व समस्यांवर आवाज उठविणार हा संघ आहे. संघाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले जाईल, असे…

Read More

युवासेनेच्या माध्यमातून साकेडी मधील स्ट्रीटलाईटचे बदलले बल्ब

युवासेना विभाग प्रमुख किरण वर्दम यांचा पुढाकार ⚡कणकवली ता.१७-: खास. विनायक राऊत यांच्या खासदार निधीच्या माध्यमातून 4 वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या साकेडी फौजदारवाडी, तांबळवाडी ते बौद्धवाडी पर्यंतच्या स्ट्रीट लाईटचे बल्ब युवासेनेच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बदलण्यात आले. युवासेना विभाग प्रमुख किरण वर्दम यांनी याकरिता पुढाकार घेत युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे काम…

Read More

पुणे पिंपरी चिंचवड येथील चाकरमान्यांसाठी अल्पदरात लक्झरी बस…

राष्ट्रवादीच्या अर्चना घारे यांचा पुढाकार:सिंधुदुर्ग युवा ग्रुप पिंपरी चिंचवड यांचे सहकार्य.. ⚡सावंतवाडी ता.१७-: गणेशोत्सव म्हणजे कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा उत्सव. या निमित्ताने शहरांत राहणारे चाकरमानी आपापल्या गावाला येतात, उत्सवात सहभागी होतात. या काळात बस, रेल्वेला होणाऱ्या गर्दीमुळे काही प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. पुणे-पिंपरी चिंचवड परीसरातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना हा त्रास सहन करावा…

Read More

दिवाणी न्यायाधीश आकाश रेडकर यांचा सत्कार

⚡वेंगुर्ला ता.१७-: बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आकाश रेडकर हे सध्या नांदेड येथे दिवाणी न्यायाधिश म्हणून कार्यरत आहेत. ते वेंगुर्ला येथे आल्यावर बॅ.खर्डेकर महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ.आनंद बांदेकर, प्रा.डॉ.विलास देऊलकर, क्रीडा संचालक प्रा.जे.वाय.नाईक, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, प्रा.देविदास आरोलकर, प्रा.नैताम, प्रा.कमलेश कांबळे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित…

Read More

माजी विद्यार्थ्यांकडून एस. एम. प्रशालेस भेटवस्तू

⚡कणकवली ता.१७-: ज्या शाळेत आपण शिकलो नवीन विश्व समजले, उद्याची स्वप्न पाहिली, त्या ज्ञानमंदिरासाठी कृतज्ञता म्हणून 1995-96 च्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांनी तब्बल 27 वर्षानंतर एकत्र येत एस. एम. हायस्कूल, कणकवली या प्रशालेस वॉटरकुलर व प्यूरिफायर सारखी महत्त्वाची वस्तू भेट देऊन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.या आदर्श प्रेरणादायी कामासाठी आपल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना एकत्रित करण्याची महत्त्वाची भूमिका…

Read More

सावंतवाडी काँग्रेसच्या वतीने सर्वसामान्य जनतेला घरगुती जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…

महेंद्र सांगेलकरचा पुढाकार:सर्वसामान्य जनतेच्या चेहऱ्यावर आनंद… ⚡सावंतवाडी ता.१७-: राष्ट्रीय काँग्रेस सावंतवाडीच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला घरगुती जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. श्री सांगेलकर हे दरवर्षी गणेश चतुर्थी निमित्त सर्वसामान्य जनतेला मदतीचा हात देत आले आहेत यावर्षीही त्यांनी हा उपक्रम राबवत सर्वसामान्य जनतेच्या चेहऱ्यावर एक प्रकारे आनंद देण्याचा प्रयत्न केला….

Read More
You cannot copy content of this page