माजी विद्यार्थ्यांकडून एस. एम. प्रशालेस भेटवस्तू

⚡कणकवली ता.१७-: ज्या शाळेत आपण शिकलो नवीन विश्व समजले, उद्याची स्वप्न पाहिली, त्या ज्ञानमंदिरासाठी कृतज्ञता म्हणून 1995-96 च्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांनी तब्बल 27 वर्षानंतर एकत्र येत एस. एम. हायस्कूल, कणकवली या प्रशालेस वॉटरकुलर व प्यूरिफायर सारखी महत्त्वाची वस्तू भेट देऊन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
या आदर्श प्रेरणादायी कामासाठी आपल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना एकत्रित करण्याची महत्त्वाची भूमिका कलंबिस्त हायस्कूलचे मुख्याध्यापक जाधव सर यांनी पार पाडून एस. एम. प्रशालेप्रती विद्यार्थी प्रेम व्यक्त केले. यामध्ये बॅचच्या सर्व 33 माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
यावेळी या बॅचच्या उपस्थित विद्यार्थ्यांचा कणकवली शिक्षण संस्था कणकवलीचे पदाधिकारी कार्याध्यक्ष डॉ.एस एन तायशेटे, सचिव डी.एम. नलावडे व उपकार्याध्यक्ष एम.ए. काणेकर यांनी सन्मान केला. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक जी. एन. बोडके यांनी कणकवली शिक्षण संस्था कणकवली व एस एम प्रशालेतर्फे या माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले.

You cannot copy content of this page