सावंतवाडी काँग्रेसच्या वतीने सर्वसामान्य जनतेला घरगुती जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…

महेंद्र सांगेलकरचा पुढाकार:सर्वसामान्य जनतेच्या चेहऱ्यावर आनंद…

⚡सावंतवाडी ता.१७-: राष्ट्रीय काँग्रेस सावंतवाडीच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला घरगुती जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

श्री सांगेलकर हे दरवर्षी गणेश चतुर्थी निमित्त सर्वसामान्य जनतेला मदतीचा हात देत आले आहेत यावर्षीही त्यांनी हा उपक्रम राबवत सर्वसामान्य जनतेच्या चेहऱ्यावर एक प्रकारे आनंद देण्याचा प्रयत्न केला. तेल,कडधान्याची,गुळ,साखर, अगरबत्ती,कापूर असे साहीत्य त्यांनी दिले असून तालुक्यातील व शहरातील तब्बल 400 ते 500 लोकांपर्यत त्यांनी हि मदत पोहचविली आहे. सध्याच्या महागाई मध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याला गणेश चतुर्थी सण साजरा करताना फार कष्ट सहन करावे लागत आहेत. महागाईने कंबरडे मोडले आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेच्या संसाराला थोडाफार हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे हे वाटप गरजू लोकांसाठी करत असल्याचे काॅगेस सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान काँग्रेसचे सावंतवाडी शहरध्यक्ष एडवोकेट राघवेंद्र नार्वेकर, सावंतवाडी तालुका सरचिटणीस रुपेश आईर, बांदा विभागीय अध्यक्ष भाऊसाहेब देसाई , सावंतवाडी काँग्रेस शहर पदाधिकारी श्री समीर भाट यांच्या उपस्थितीत हे साहीत्य त्यांनी वाटप केले.

You cannot copy content of this page