स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ‘दिवाळी सेल’ उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा…
⚡सावंतवाडी ता.०९-: विद्यार्थ्यांना जीवन कौशल्य अवगत व्हावे व त्यांच्यामधील सर्जनशील वृत्तीचा विकास व्हावा यासाठी स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ‘दिवाळी सेल’ हा उपक्रम करण्यात आला. या उपक्रमामध्ये सेलसाठी विविध वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये, विणलेले रुमाल, तोरणे, केसांना लावण्याचे क्लिप, लहान व मोठ्या आकाराचे आकाश कंदील, विद्यार्थ्यांनी स्वतः रंगविलेल्या पणत्या, दिवाळीसाठी लागणारा फराळ, रंगीबेरंगी मेणबत्त्या, सुगंधी…
