वेंगुर्ला प्रतिनिधी- कोल्हापूर येथे 4 व 5 रोजी झालेल्या शालेय रायफल शुटिंग
विभागीय स्पर्धेत बॅ.खर्डेकर महाविद्यालयाची 12 वी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कु. राजकुमारी हिंदुस्थानी संजय बगळे हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला असून तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल तिचा शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे पेट्रन कौन्सिल मेंबर बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, माजी प्राचार्य डॉ.ए.पी.बांदेकर, पर्यवेक्षक डी.जी.शितोळे, प्रा.एम बी चौगुले, प्रा.डी.आर.आरोलकर, जिमखाना चेअरमन व्ही.पी.देसाई, क्रिडा शिक्षक हेमंत गावडे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. राजकुमारी हिला क्रीडा शिक्षक हेमंत गावडे व उपरकर शुटिंग अकॅडमीचे कांचन उपरकर यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटोओळी – राजकुमारी हिंदुस्थानी बगळे हिचा बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
राजकुमारी बगळे हिचे शुटींग स्पर्धेत यश…
