मुक्तविद्यापिठामुळे तरुण-तरुणी उच्चशिक्षित-: प्रज्ञा परब…

वेंगुर्ला प्रतिनिधी- मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून बॅ. खर्डेकर महाविद्यालयाने इथल्या युवकयुवतींना तसेच नोकरी करणा-या व्यक्तींना शैक्षणिक प्रवाहात आणून व्यासपिठ उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे कामधंदा सांभाळून तरुण-तरुणी उच्चशिक्षित होत आहेत. या शिक्षणाचा त्यांना व्यावहारिक जीवनात उपयोग होत आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकत्र्या प्रज्ञा परब यांनी केले.
बॅ.खर्डेकर महाविद्यालय येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे शिक्षणक्रम उपलब्ध असून बी.ए.आणि बी.कॉम. विद्याथ्र्यांच्या शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील संपर्क सत्रांचे उद्घाटन प्रभारी प्राचार्य डी.आर.आरोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्र संयोजक डॉ.एम.बी.चौगले, केंद्र सहाय्यक जी.पी.धुरी, डॉ.बी.जी.गायकवाड, सामाजिक कार्यकत्र्या प्रज्ञा परब, प्रा.एम.आर.नवत्रे, प्रा.आर.जी.चौगले आदी उपस्थित होते.
केंद्र संयोजक डॉ.एम.बी.चौगले यांनी मुक्त विद्यापीठाचे ध्येयधोरणे आणि मुक्त विद्यापीठाकडे विद्याथ्र्यांचा वाढता कल याविषयी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करून आपण शैक्षणिक चळवळीत सहभागी झाल्याबद्दल विद्याथ्र्यांचे कौतुक केले. संपर्क सत्रासाठी मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्याथ्र्यांना पुस्तक प्रदान करण्यात आली. सूत्रसंचालन केंद्र संयोजक डॉ.एम.बी.चौगले तर आभार डॉ.बी.जी.गायकवाड यांनी मानले.

You cannot copy content of this page