⚡वेंगुर्ला ता.०८-: नगर वाचनालय, वेंगुर्लातर्फे श्रीकृष्ण स. सौदागर स्मृती पुरस्कृत वेंगुर्ला शहर व उभादांडा परिसरातील प्राथमिक शाळांसाठी वैयक्तिक व सामुहिक स्वरूपाच्या मराठी सांस्कृतीक कार्यक्रम 5 नोव्हेंबर रोजी संपन्न झाले. या स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे.
कवितागायन स्पर्धा – पहिली ते चौथी (वैयक्तिक गट) – प्रथम-मनस्वी रेडेकर (उभादांडा नं.1), द्वितीय रूद्र स्वार (वेंगुर्ला नं.3), तृतीय-वेदा नेरूरकर (राणी लक्ष्मीबाई कन्याशाळा), चतुर्थ-श्रेया डामसे (दाभोस शाळा), पाचवा – माधव ओगले (वेंगुर्ला नं.2), अभंग गायन-पाचवी ते सातवी (वैयक्तिक गट)-प्रथम-आदित्य नवार (उभादांडा नं.1), द्वितीय-अदिती चव्हाण (एम.आर.देसाई स्कूल), तृतीय-सुरेंद्र प्रजापती (वेंगुर्ला नं.3), चतुर्थ-हेतल शिरोडकर (वेंगुर्ला नं.2), पाचवा- गुरूदेव दामले (वेंगुर्ला नं.1), समुह नृत्य – पहिली ते चौथी – (सामुहिक गट)-प्रथम-राणी लक्ष्मीबाई कन्याशाळा, द्वितीय-भटवाडी नं.1, तृतीय-परबवाडा नं.1, चतुर्थ-वेंगुर्ला नं.2, पाचवा-उभादांडा नं.1, समुह नृत्य – पाचवी ते सातवी – (सामुहिक गट)-प्रथम-परबवाडा नं.1, द्वितीय-उभादांडा नं.1, तृतीय-उभादांडा नवाबाग, चतुर्थ-वेंगुर्ला नं.2
स्पर्धांचे परिक्षण प्रा.महेश बोवलेकर, माया परब, विठ्ठल करंगुटकर यांनी केले. स्पर्धेसाठी साथसंगत गजानन मेस्त्री व वेतोरकर यांनी दिली. यावेळी संस्थेचे कार्यकारी सदस्य दिपराज बिजितकर, श्रीनिवास सौदागर, सचिन होडावडेकर, शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वी विजेत्यांना जानेवारी 2024 मध्ये गौरविण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल सौदागर यांनी तर कार्यवाह कैवल्य पवार यांनी प्रास्ताविक केले.
श्रीकृष्ण सौदागर स्मृती विविध स्पर्धा संपन्न…
