⚡मालवण ता.०८-: मालवण येथील सौरभ ताम्हणकर मित्रमंडळातर्फे नरकासुर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. लहान मुलांचा गट व मोठा गट अशा दोन गटात ही स्पर्धा होणार असून यातील प्रथम तीन विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे.
यामध्ये लहान मुलांसाठी इको फ्रेंडली नरकासुराची अट असून स्पर्धेत फोन किंवा व्हाट्सऍप द्वारे सहभाग दर्शविणाऱ्या पहिल्या दहा स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. मोठ्या गटासाठी इकोफ्रेंडलीची अट नसून नरकासुर मोठा असावा. तसेच दोन्ही गटासाठी एखाद्या मंडळासोबत कृष्णाची वेशभूषा असणे आवश्यक असून नरकासुर देखावा व्यसनमुक्ती, प्लास्टिक मुक्ती व महिला सुरक्षितता याविषयी संदेश देणारा असावा, असे नियम व अटी ठेवण्यात आल्या आहेत. नाव नोंदणीसाठी सौरभ ताम्हणकर (९२०९३३३०१२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
