सौ. श्वेता कोरगावकर:तात्काळ मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची केली मागणी…
⚡बांदा ता.०८-: भारतातील स्त्री ही कर्तृत्ववान व अनेक क्षेत्रात प्रविण्य मिळविलेली आहे. आज प्रत्येक आव्हानत्मक क्षेत्रात स्त्रीने आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. मात्र महिलांच्या मतांवर निवडून आलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अत्यंत असभ्य भाषेत स्त्रीवर भाष्य केल्याने हे निंदनीय व निषेधार्य आहे. समस्त महिला वर्गाच्या माध्यमातून नितीशकुमार यांच्या कृतीचा जाहीर निषेध असून त्यांनी तात्काळ मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपच्या सिंधुदुर्ग जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर यांनी केली आहे.
बिहारच्या विधानसभेत मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्त्री शिक्षण व लोकसंख्या नियंत्रण या संदर्भात बोलताना समस्त महिला वर्गावर असभ्य भाषेत टिका केली. मात्र आपण मुख्यमंत्री या महिलांच्या मतांवर झालो हे नितीशकुमार सोईस्करपणे विसरले. त्यांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागितली आहे. मात्र केवळ माफीनामा योग्य नसून नितीशकुमार यांनी तात्काळ आपल्या मुख्यमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा.
त्यांचे भाष्य हे केवळ बिहार मधीलच महिलांचा अपमान नसून समस्त स्त्रीवर्गाचा आहे. आज सर्वच क्षेत्रात महिला कार्यरत आहेत. अनेक उच्च पदस्त अधिकारी पदी महिला कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या या कृतीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत.
