⚡सावंतवाडी ता.०९-: केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत सावंतवाडी नगरपरिषद मार्फत शहरी गरीबांसाठी वेगवेगळ्या योजनांचा लाभ देऊन त्यांना उपजीविकेची संधी उपलब्ध करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातात.दरम्यान अभियानांतर्गत राबविल्या जाणाऱ्या कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य, कौशल्य विकास विभागाच्या तत्कालीन प्रधान सचिव सौ, मनीषा वर्मा तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी सौ. के. मंजुलक्ष्मि यांनी भेट देऊन प्रशिक्षण उत्कृष्टरित्या सुरु असल्याबाबत गौरौद्गार काढले होते.
याच प्रशिक्षण कार्यक्रमाच्या डोमेस्टिक डाटा एन्ट्री ऑपरेटर व अकाउंट एक्झिक्युटिव्ह वर्गाच्या 120 लाभार्थ्यानी हे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांना सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. सागर साळुंखे सावंतवाडी नगरपरिषदेचे यांच्या हस्ते श्री साई इन्फोटेक सावंतवाडी येथे आयोजित कार्यक्रमात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
प्रास्ताविकात शहर अभियान व्यवस्थापक . एकनाथ पाटील यांनी कौशल्य प्रशिक्षणाची सविस्तर माहिती देऊन भविष्यात या प्रशिक्षणाचा लाभ रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी मिळण्यासाठी होतो हे स्पष्ट केले. यावेळी मुख्याधिकारी श सागर साळुंखे साहेब यांनी यशस्वी लाभार्थ्याना मार्गदर्शन करताना आपण घेतलेल्या कौशल्य प्रशिक्षणाचा उपयोग करून आपले भविष्य उज्ज्वल करावे असे सांगून लाभार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आभार व्यक्त करताना श्री साई इन्फोटेक सावंतवाडीचे श्री. तानावडे यांनी सावंतवाडी नगरपरिषद, दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांच्या माध्यमातून सदरचे प्रशिक्षण लाभार्थ्यांना मोफत दिलेले असून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सोळा लाभार्थ्यांना आतापर्यत रोजगार मिळालेला आहे उर्वरित लाभार्थ्यांना लवकरच रोजगार किंवा स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस असल्याचे सांगितले.या कार्यक्रमास सावंतवाडी नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी श्री. वैभव अंधारे तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेले लाभार्थी उपस्थित होते.
