तळेबाजार हायस्कूलचे तीन विद्यार्थी जखमी;एसटीचे एक लाखाचे नुकसान…
देवगड
देवगड आगाराची देवगड वरेरी देवगड या दुपारी १२.३० वा सुटणाऱ्या प्रवासी फेरीला दु.२ च्या सुमारास तळवडे खडवी येथे तीव्र उतारावर चालकाचा ताबा सुटला व नजीकच्या खोल दरीत सुमारे १५० फूट खाली जाऊन मांगरावर अडकली. अपघातात तळेबाजार हायस्कुल चे तीन विद्यार्थ्यांनीना दुखापत झाल्याची घटना घडली. या अपघातात एसटी चे सुमारे १ लाख रुपये एवढे नुकसान झाले आहे.
अपघातात तळेबाजार हायस्कुल ची विद्यार्थिनी प्रांजल सचिन मिराशी (१७ )हिच्या उजव्या पायाच्या मांडीला दुखापत,भावना भास्कर धुरी(१४) खांद्याला दुखापत, रा तळवडे दिव्या सागर कदम(१२) रा गंढिताम्हणे हिच्या पायाला मुकामार दुखापत झाली त्यांना ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करुन अधिक उपचाराकरिता ओरोस येथे हलविण्यात आले दरम्यान अपघाताचे वृत्त समजताच तळेबाजार विद्यालय संस्थेचे अध्यक्ष संदीप तेली,कोषाध्यक्ष संतोष वरेरकर तसेच शिक्षक वर्ग यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन दुखापत झालेल्या विद्यार्थिनींची विचारपूस केली. त्याच्या खांद्याला कमरेला दुखापत झाल्याचे समजले.घटनास्थळी विभागीय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख यंत्र अभियंता प्रशांत वासकर देवगड आगाराचे आगार व्यवस्थापक निलेश लाड,स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर यांनी भेट देऊन जखमींची विचारपूस केली व तातडीची आर्थिक मदत प्रत्येकी रु १०००/-हजार तातडीची मदत देण्यात आली .
या घटनेची फिर्याद देवगड पोलीस स्थानकात चालक संदीप प्रकाश मढवी यांनी दिली असून ते या प्रवासी फेरीवर सेवा बजावीत होते.या प्रवासी फेरीत सुमारे १५ विद्यार्थी अन्य १ प्रवास करीत होते.त्यापैकी तीन विद्यार्थीनीना दुखापत झाली. आहे.
