Headlines

आठवण ठेवून माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येणे कौतुकास्पद…

शिक्षणमंत्री केसरकर:आर पी डी हायस्कूल येथे माजी शिक्षकांचा केला गौरव ⚡सावंतवाडी ता.२५-: शाळेची जुनी आठवण ठेवून आज तुम्ही एकत्र आलात हे खरच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले. दरम्यान या शाळेची भरभराट होत असताना ते येऊन बघणं व कौतुक करणं हा देखील एक जीवनातील आनंदाचा क्षण असतो असे…

Read More

ठाकरे कुठे होते आणि कुठे आले…

निलेश राणें:आदित्य ठाकरेंच्या खळा बैठकीवर शेलक्या भाषेत टीका.. ⚡कुडाळ ता.२४-: भाजप नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते शुक्रवारी कुडाळमधील अनेक विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी कुडाळ शहरासाठी अजूनआवश्यक तो निधी देण्यात येईल, असे आश्वासन दिले.यावेळी निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या बुधवारी पार पडलेल्या खळा बैठकीवर तसेच संजय राऊत यांच्यावर शेलक्या भाषेत टीका…

Read More

मालवण येथील मच्छिमारांची मत्स्य विभाग कार्यालयावर धडक…

आश्वासनांची पूर्तता होत नसल्याने१ डिसेंबरपासून उपोषण छेडण्याचा दिला इशारा… ⚡मालवण ता.२४-: आठवडाभरापूर्वी पारंपारिक मच्छिमारांनी अनधिकृत पर्ससीन मासेमारीवर कारवाई व इतर मागण्यांसाठी छेडलेले उपोषण मत्स्य विभागाने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित केले असताना या आश्वासनांची पूर्तता होत नसल्याने आज पारंपारिक मच्छिमारांनी पुन्हा मालवण येथील मत्स्य विभाग कार्यालयावर धडक देत सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त श्री. अलगिरी यांची भेट…

Read More

सावंतवाडी येथे उद्या आचार्य पं. मुकुल शिवपुत्र यांचा गंधर्वगान कार्यक्रम…

दीपक केसरकर मित्रमंडळाच्यावतीने आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.१७-: शास्त्रीय संगीत मैफिल आचार्य पं. मुकुल शिवपुत्र यांचा गंधर्वगान सावंतवाडी राजवाडा येथे उद्या शनिवार दि.२५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे.उद्या राजवाडा येथे कार्यक्रम होणार आहे. सिंधुदुर्गात मुकुलजींचा पहिलाच जाहीर परफॉर्मन्स होणार असल्याने कोकण वासिय संगीत शौकिनांमध्ये आनंदाचं वातावरणपसरल आहे. त्रिपुरारी पौर्णिमा निमित्ताने दिपक केसरकर मित्रमंडळाच्यावतीने…

Read More

वैभव नाईक यांचा येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत होणार…

रुपेश पावसकर: गटातटाच्या राजकारणाला कंटाळून शिंदे शिवसेनेत केला प्रवेश.. ⚡कुडाळ ता.२४-: उबाठा सेनेचे आमदार वैभव नाईक हे गटातटाच राजकारण करत आहेत. दोन गट निर्माण करतात आणि या दोन गटांमध्ये भांडण लावून देण्याचा प्रयत्न करतात. या दोन्ही गटाचे मालक होण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे शिवसेनेमध्ये आमदार वैभव नाईक यांच्याविरोधात जुन्या कार्यकर्त्यांमध्ये फार मोठी खदखद आहे. त्याची…

Read More

मुळदे येथे कार्तिक स्वामी दर्शन सोहळा २६ व २७ नोव्हेंबर रोजी…

⚡कुडाळ ता.२३-: कुडाळ तालुक्यातील मुळदे येथील ॐ श्री नवनाथ श्रद्धास्थान या नवनाथ उपासक प. पू. श्री बाळकृष्ण महादेव घडशी महाराज यांच्या तपोभूमीत कार्तिक स्वामींचे दर्शन घेता येणार आहे. कार्तिक शुक्ल चतुर्दशी (त्रिपुरारि पौर्णिमा) रविवार, २६ नोव्हेंबर या दिवशी दुपारी ३ वाजून १४ मिनिटांपासून ते सोमवार, २७ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १ वाजून ३५ मिनिटांपर्यंतच्या कालावधीत…

Read More

सह्याद्री लगतच्या गावांमध्ये अवकाळी पाऊस…

⚡कुडाळ ता.२४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. कुडाळ तालुक्यातील काही भागात मेघगर्जनेसह संततधार पाऊस झाला. यामध्ये सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या हिर्लोक, नारूर, माणगाव, वाडोस, पांग्रड, वेताळ बांबर्डे, पणदूर आदी गावांमध्ये हा पाऊस आला. काही दिवसांपूर्वीच थंडीचे आगमन झाले असतानाच दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे कोकणातील बागायतदार वर्गाची…

Read More

हुमरमळा वालावल ग्रामपंचायतींवर आमदार वैभव नाईक यांचेच वर्चस्व…

सरपंचपदी अमृत देसाई तर उपसरपंचपदी रश्मी वालावलकर यांची निवड.. ⚡कुडाळ ता.२४-: तालुक्यातील हुमरमळा (वालावल) ग्रामपंचायत गेली कित्येक वर्षे अतुल बंगे यांच्या नेतृत्वाखाली खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना विकासनिधी मोठ्या प्रमाणात येत आहे. २०२३ च्या निवडणुकीत अतुल बंगे यांना शह देण्यासाठी भाजपची जिल्ह्यातील मंडळी ठाण मांडून…

Read More

साटेली भेडशी उपसरपंच पदी सुमन डिंगणेकर यांची बिनविरोध निवड…

⚡दोडामार्ग ता.२४-: तालुक्यातील सर्वात मोठया आणि नुकतीच पंचवार्षिक निवडणूक झालेल्या साटेली भेडशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुमन डिंगणेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीत थेट सरपंच म्हणून छाया धर्णे निवडून आल्या आहेत . उपसरपंच पदासाठी शुक्रवारी (ता.24)निवडणूक निर्णय अधिकारी सुजित गायकवाड यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी उपसरपंच पदासाठी सुमन गणपत डिंगणेकर यांचा एकमेव अर्ज…

Read More

आचरा उपसरपंच पदी भाजपचे संतोष मिराशी बिनविरोध…

⚡मालवण ता.२४-: आचरा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे संतोष मिराशी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी अजय परब यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. नुतन उपसरपंचांचे सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी अभिनंदन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर, योगेश गावकर, महेंद्र घाडी,पंकज आचरेकर,चद्रकांत कदम,किशोरी आचरेकर, हर्षदा पुजारे, श्रृती सावंत,सायली…

Read More
You cannot copy content of this page