ठाकरे कुठे होते आणि कुठे आले…

निलेश राणें:आदित्य ठाकरेंच्या खळा बैठकीवर शेलक्या भाषेत टीका..

⚡कुडाळ ता.२४-: भाजप नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते शुक्रवारी कुडाळमधील अनेक विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी कुडाळ शहरासाठी अजून
आवश्यक तो निधी देण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या बुधवारी पार पडलेल्या खळा बैठकीवर तसेच संजय राऊत यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली.
ठाकरे अगोदर जाहीर सभा करायचे ते मी एकले होते. नंतर त्यांच्यातील ठाकरे कॉर्नर सभा घ्यायला लागले. आता ते खळ्यात आले. यानंतर कुठे जातील याचा अंदाज तुम्हीच घ्या, अशा शेलक्या भाषेत निलेश राणेंनी आदित्य ठाकरे यांच्या खळा बैठकीवर टीका केली. ठाकरे कुठे होते आणि कुठे आले, काय अवस्था झालीय. माझ्या त्यांच्या या प्रवासाला शुभेच्छा असा खोचक टोला लगावला.

तर निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना म्हटले की, पिक्चर अभी बाकी है ! संजय राऊत रिकामटेकडे असल्यामुळे रोज व्हिडिओ शोधत असतात. त्यांचाच एक दिवस पिक्चर येईल. त्यांची जी भानगड आहे, स्वतःच किती झाकून ठेवले ते येणाऱ्या काळात आम्ही दाखवू शकतो. पण राजकारणात काही लोकांनी मर्यादा ठेवायला पाहिजे. राऊत ही व्यक्ती मर्यादा न ठेवणारी आहे. येणाऱ्या काळात त्यांचेही व्हिडिओ निघतील. त्यावर दुसऱ्यांवर बोट दाखवून काय फायदा नसेल. पण संजय राऊत आता व्हिडीओपार्लर चालवल्यासारखे काम करतात. राज्यसभेच्या खासदारांकडून महाराष्ट्राला दिशा मिळेल अशी अपेक्षा असते, ती त्यांच्याकडून नाही. अजून काही व्हिडीओ बघायचे असतील तर त्यांना आम्ही पाठवण्याची व्यवस्था करू.

देशाला २०१४ पासून पनवती लागलीय, असा संजय राऊतांचा मोदींना अप्रत्यक्ष टोला लगावला होता. यावर निलेश राणेंनी पलटवार केला आहे. संजय राऊत हा कुठल्या थराचा माणूस आहे हे यावरून लक्षात येत. आम्ही म्हणू शकतो की संजय राऊत टीव्हीवर दिसायला सुरूवात झाली तेव्हापासून महाराष्ट्राला पनवती लागली. पण जरी संजय राऊत ही पनवती लागली असली तरी आम्ही ते म्हणणार नाही. आपले महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी काय योगदान आहे किंवा ते जिथे राहतात तिथे, मुंबई शहरासाठी काय योगदान ? स्वतःचा मतदारसंघ सुधारू शकत नाही आणि कुठे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलतो. तुमची तेवढी उंची, पातळी देखील नसल्याची टीका संजय राऊत यांच्यावर केली आहे.

नौसेना दिन न भूतो न भविष्यती असा होणार
नौसेना दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्गात येतायेत आणि त्यात नौदलाचा कार्यक्रम असल्याने नीटनेटका असणार. न भूतो न भविष्य असा दिमाखदार कार्यक्रम असणार. पंतप्रधान स्वतः सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणार आहेत. आपल्यासाठी हा मोठा दिवस असेल, असे भाजप नेते निलेश राणे म्हणाले.

You cannot copy content of this page